महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया,कोणत्या तारखेला कुठे मतदान?
लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली.
The Election Commission of India releases the schedule for Bye-Elections in 26 ACs along with GE 2024. pic.twitter.com/KjBjJNHDJL
— ANI (@ANI) March 16, 2024
पहिला टप्पा – शुक्रवार, दि.19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा – शुक्रवार, दि. 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा – मंगळवार, दि. 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा – सोमवार, दि. 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा- सोमवार, दि. 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई
आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. शिवाय देशात काही राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तिथेही निवडणुका होणार आहेत.
१०.५ लाख पोलिंग बूथ असून ९७ कोटींपेक्षा जास्त मतदार आहे. देशातील भौगोलिक परिस्थिती निराळी आहे. तरीही विनासायास निवडणुका पार पाडण्याचा आयोगाचा अनुभव आहे. ५४ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्सद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार असून दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
Lok Sabha elections | First phase to be held on 19th April, second phase on 26th April, third phase on 7th May, fourth phase on 13th May, fifth phase on 20th May, sixth phase on 25th May and the seventh phase on 1st June: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/rT78EiNOA8
— ANI (@ANI) March 16, 2024
यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी १.८२ कोटी नवमतदार आहेत
४८ हजार तृतीयपंथी मतदार
१०० वर्षांवरील मतदार २ लाख
४९.७ कोटी पुरुष मतदार
४७.१ कोटी महिला मतदार
१८ ते २१ वयोगटातील २१.५० कोटी मतदार
८२ लाख प्रौढ मतदार
महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे.
Schedule :General Election to Lok Sabha 2024#ECI #GeneralElections2024 pic.twitter.com/2fjMIsxIw3
— Election Commission of India (@ECISVEEP) March 16, 2024
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, मसल आणि मनी पॉवर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पावलं उचलली गेली आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. मागील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पैसा आणि बळाचा वापर झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे सगळ्या हिंसा आणि पैशांचा गैरवापर आम्ही होऊ देणार नाहीत.
‘मिथ वर्सेस रियालिटी’ अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.