भावाने बहिणीला मूल होत नाही म्हणून केली अजब गोष्ट आणि…
गुरूग्राम
मूलबाळ होत नसेल, तर वैद्यकीय उपचारांद्वारे किंवा दत्तक घेऊन मुलाच्या संगोपनाची इच्छा पूर्ण करता येते. गुरूग्राममधल्या एका भावाने मात्र बहिणीला मूल होत नाही म्हणून अजब गोष्ट केली.
त्यामुळे त्याला जेलची हवाही खावी लागली.
मूलबाळ होत नसलेल्या दाम्पत्यांसाठी आता अनेक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. मात्र प्रत्येकाला ते लागू पडत नाहीत. त्यामुळेच काही जोडप्यांच्या संसारात चिमुकल्यांचा प्रवेश होऊ शकत नाही. त्यांना मूल दत्तक घेता येऊ शकतं. इतकं सगळं असूनही गुरूग्राममधल्या एका भावाने बहिणीला मूल होत नाही म्हणून अजब गोष्ट केली. त्यासाठी त्याने स्वतःच्या भविष्याचीही पर्वा केली नाही. त्याच्या या कृत्याची परिसरात खूप चर्चा होते आहे. बहिणीवरच्या प्रेमापोटी त्याने केलेल्या कृत्याचं काही जण कौतुकही करत आहेत, मात्र त्यामुळेच त्याला पोलिसांनी अटक केलीय.
हरियाणाच्या गुरूग्राम जिल्ह्यात एका भावाने केलेलं ते कृत्य विचित्रपणाचा कळस ठरलंय. बहिणीला मूल होत नसल्याने एका व्यक्तीनं चक्क मुलाची चोरी केली. बिट्टू उर्फ रावण याच्या बहिणीला मूलबाळ नाही. त्यामुळे बहिणीसाठी त्याने त्याच परिसरातलं एक मूल चोरलं. मात्र बहिणीने त्या मुलाला स्वीकारायला नकार दिल्याने हे प्रकरण त्याच्या अंगलट आलं. बहिणीने नकार दिल्यावर मुलाचं काय करायचं, असा प्रश्न त्याला पडला. मात्र त्याने चोरी केलेल्या मुलाला परत द्यायचं सोडून स्वतःच्या गावी नेण्याचा निर्णय घेतला.
मुलाची अखेर सुटका
मुलाचं अपहरण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पालकांनी मूल हरवल्याची पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी (12 मार्च) आरोपीच्या गढी या गावी जाऊन मुलाची सुटका केली व आरोपी धर्मपाल उर्फ बिट्टू याला अटक केली. बहिणीला मूल देण्याच्या नादात आरोपीला स्वतःला कैदेत जावं लागलं. अपहरण झालेल्या मुलाला त्याला आई-वडिलांच्या ताब्यात दिल्याचं पोलिसांनी म्हटलंय. तसंच आरोपीवर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.
भावा-बहिणीच्या प्रेमाचे अनेक किस्से आपण ऐकतो, पण प्रेम व्यक्त करताना इतरांचं मन दुखावलं जाणार नाही ना, याचीही काळजी घेतली पाहिजे. गुरूग्राममधल्या या भावाने बहिणीबाबत दाखवलेल्या प्रेमाचंही काहींना कौतुक वाटलं असेल, पण कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हा आहे. त्यामुळेच त्याचा हेतू चांगला असूनही त्याने निवडलेली पद्धत चुकीची ठरली.