ताज्या बातम्याराजकीय

बंगालमध्ये भाजप इतिहास घडवणार ! ममतादीदींच्या बालेकिल्ल्यात मोदींची लाट


राज्यात लोकसभेचं वारं वाहू लागलं आहे, सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. यावेळी सर्वच विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत.

त्यांनी एक मजबूत मोट बांधली आहे. त्यामुळे यावेळी एनडीए विरोधात इंडिया आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान मतदारांची कोणाला पसंती आहे? देशाचा मूड काय आहे? तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार की इंडिया आघाडी बाजी मारणार? हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे नेटर्वक 18 ने मेगा ओपिनिअन पोलच्या माध्यमातून. जाणून घेऊयात पश्चिम बंगालमधील जनतेचा कौल नेमका यावेळी कोणाच्या बाजूने असेल.

पश्चिम बंगालमध्ये नेहमी भाजप आणि तृणमुल काँग्रेसमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद पेटलेला असतो. अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही भाजपच्या बाजूने कल दिसून येत आहे. ममतादीदींच्या बालेकिल्ल्यात एनडीए 25 जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर इथं काँग्रेसला भोपळाही फोडता येणार नाही तर इतर अर्थात तृणमूल काँग्रेसला 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी एनडीएला 42 टक्के मतांचं विभाजन होणार आहे. तर इंडिया आघाडीला 14 मतांची टक्केवारी आणि तृणमूल काँग्रेसला 44 टक्के मतांची टक्केवारी दाखवत आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत, गेल्या निवडणुकीमध्ये भाजपनं तिथे तृणमूल काँग्रेसला तगडी लढत दिली होती. पश्चिमबंगामध्ये गेल्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या 22 जागा निवडून आल्या होत्या. तर भाजप 18 जागांवर विजयी झालं. काँग्रेसला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. टक्केवारीचा विचार केल्यास पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 43.7 टक्के मतदान झालं होतं. भाजपला 40. 6 तर काँग्रेसला 5.7 टक्के मतदान झालं होतं. दरम्यान हाती आलेल्या सर्व्हेनुसार यावेळी भाजपला इतक्या जागा मिळण्याची शक्यता आहे. तर तृणमूलला इतक्या जागा मिळू शकतात. दुसरीकडे काँग्रेसला इतक्या जागा मिळण्याचा अंदाज आहे. टक्केवारीचा विचार केल्यास तृणमूल काँग्रेसला इतके टक्के मतदान होऊ शकतं भाजप व काँग्रेसला अनुक्रमे इतके टक्के मतदान होण्याची शक्यता आहे.

सर्व्हे नेमका कसा करण्यात आला?

543 जागांपैकी 518 लोकसभा मतदारसंघात हा सर्व्हे करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख 8 हजार 780 नमुने घेण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 1 लाख 18 हजार 616 नमुने घेण्यात आले आहे. आतापर्यंत कोणत्याही सर्व्हेमध्ये ही सर्वाधिक आकडेवारी आहे. 543 पैकी 518 लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन हा सर्व्हे तयार करण्यात आला आहे.

किती राज्यात केला सर्व्हे?

‘मेगा ओपनियन पोल’साठी एकूण 21 राज्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आणि 3 विधानसभा मतदारसंघात सुद्धा हा सर्व्हे झाला आहे. एका विधानसभा मतदारसंघातील ५ बूथवर हा सर्व्हे झाला आहे. विशेष म्हणजे, या सर्व्हेमध्ये लोकांची मतं जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षरित्या भेट घेऊनच मत नोंदवण्यात आलं आहे. देशभरातील 1 लाख 20 हजार लोकांचा या सर्व्हेमध्ये सहभाग आहे. महत्त्वाचं म्हणजे, पारदर्शकता आणण्यासाठी एकदा नाही तर दोनदा हा सर्व्हे करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button