कोविड लसीचे 217 इंजेक्शन घेतलेल्या व्यक्तीचं काय झालं?
जेव्हा संपूर्ण जग कोविड 19 साथीच्या आजारातून जात होतं, तेव्हा शास्त्रज्ञ लस विकसित करण्यात सतत व्यस्त होते आणि काही लसी तयार देखील केल्या गेल्या ज्याचा अनेकांना फायदा झाला.
सुरुवातीला लोकांनी त्याचे दोन डोस घेतले. त्यानंतर जगातील अनेकांना या लसीचे तिसरे इंजेक्शनही मिळाले. ज्याला बुस्टर डोस देखील म्हटलं जाऊ लागलं.
मात्र, या लसींबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. ज्यामुळे लोकांच्या मनात अनेक संभ्रम तयार झाले. पण एक अशी व्यक्ती आहे जिने 217 पेक्षा जास्त शॉट्स घेतल्या, पण आता त्या व्यक्तीचं काय झालं?
एका जागतिक अभ्यासात असे आढळून आले आहे की कोविड-19 लसीकरणानंतर अनेक लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्या आहेत. अनेकांच्या हृदयाला सूज आली होती. त्याचे इतर परिणामही सांगितले. पण जगभरातील अनेक देशांमध्ये लोकांनी स्वत:हून तिसरा शॉट पूर्ण केला. एवढंच काय तर अनेकांनी त्याहून अधिक डोस देखील घेतले.
COVID-19 लसीचे 11 डोस घेतलेली व्यक्ती भारतीय
जानेवारी 2022 मध्ये, बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील एका वृद्ध व्यक्तीने दावा केला की त्याला COVID-19 लसीचे 11 पेक्षा जास्त डोस मिळाल्यानंतर, त्याला सांधे आणि पाठदुखीमध्ये मदत झाली. जे उपचारांच्या इतर पद्धतींनी शक्य नव्हते. ते या लसीमुळे शक्य झालं.
जर्मन माणसाने 217 शॉट्स घेतले
4 मार्च रोजी, द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात 62 वर्षीय जर्मन व्यक्तीने वैयक्तिक कारणांसाठी 29 महिन्यांत कोविड-19 लसीचे 217 पेक्षा जास्त डोस घेतले.
संशोधकांनी या व्यक्तीवर होणारा जास्त लसीकरणाचा परिणाम अभ्यासला. त्यांनी त्यांच्या निष्कर्षांची तुलना 29 निरोगी व्यक्तींच्या गटाशी केली ज्यांना ‘केवळ’ तीन COVID-19 लसीचे डोस घेतले होते.
संशोधकांना वारंवार लसीकरण केल्यामुळे रोगप्रतिकारक पेशींवर कोणताही प्रभाव आढळला नाही. या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती पूर्ण बरी होण्याची चिन्हे देखील होती. म्हणजेच, या व्यक्तीने कोविड-19 च्या अनेक लसी चांगल्या प्रकारे सहन केल्या होत्या. याचे त्या व्यक्तीला कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत, तर उलटा फायदाच झाला.