ईदचा चंद्र कधी येईल, जाणून घ्या चंद्र दर्शनाची वेळ
रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर ईद-उल-फितरचा सण इस्लामिक कॅलेंडरनुसार शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हेच कारण आहे की आज सर्व रोजे करणारे मुस्लिम बांधव चंद्रदर्शनाची वाट पाहत आहेत. तुम्हीही चंद्राची वाट पाहत असाल तर जाणून घ्या ईदचा चंद्र कधी दिसणार आहे….
रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर ईद-उल-फितरचा सण इस्लामिक कॅलेंडरनुसार शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो.
कधीपासून होईल रमजान मासारंभ ? (Ramadan Start Date)
मुस्लिम धर्मानुसार, चंद्र दर्शनाने रमजान मासारंभ होतो. प्रमुख मुस्लिम देश सौदी अरेबियामध्ये रमजानचा चंद्र सर्वात आधी दिसतो. सौदी अरेबियामध्ये चंद्र दर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानात चंद्र दर्शन होत रमजान मासारंभ होते. त्यानुसार, आज म्हणजेच 10 मार्च रोजी सौदी अरेबियामध्ये रमजानचा चंद्र दिसला तर भारतात 11 मार्च रोजी पहिला रोजा केला जाईल. जर 11 मार्च रोजी सौदी अरेबियामध्ये रमजानचा चंद्र दिसला तर 12 मार्च रोजी पहिला रोजा केला जाईल. अशा परिस्थितीत, यावर्षी भारतात रमजान 11 किंवा 12 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पहिला रोजा पाळला जाईल.
रमजानचे महत्त्व (Importance of Ramadan)
मुस्लिम मान्यतेनुसार, रमजानचे रोजे 29 किंवा 30 दिवस पाळले जाते. ईदचा चंद्र कधी दिसतो यावर रोजाची संख्या ठरते. इस्लाम धर्मानुसार, रोजे केल्याने अल्लाहची कृपा होते. असे मानले जाते की, या महिन्यात केलेल्या रोजाचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत 70 पटीने जास्त मिळते. चंद्र दिसल्यानंतर मुस्लिम समाजातील लोक सूर्य उगवण्यापूर्वी सेहरी खाऊन रोजा सुरू करतात. सूर्योदयापूर्वी खाल्लेल्या अन्नाला सेहरी म्हणतात आणि सूर्यास्तानंतर रोजा सोडण्याला इफ्तार म्हणतात.