क्राईम

‘सुट्टी भेटत नाही’ म्हणून प्राध्यापक घरी आलाच नाही,प्रोफेसर नवऱ्याचं सुरू होतं भलतंच प्रकरण, सत्य समोर येताच


सुट्टी मिळत नाही असा बहाणा बनवून एक प्रोफेसर वर्षभर घरीच गेला नाही. सुरुवातीला पत्नीनेदेखील यावर विश्वास ठेवला. मात्र, बरेच महिने उलटून गेले तरी नवरा घरी आला नसल्याने तिला थोडा संशय आला.

अखेर तिने नवऱ्याचे सत्य शोधायचे ठरवले. नंतर जे काही समोर आले ते पाहून ती चांगलीच संतापली. बायकोने आणि मेहुणीने नवऱ्याला चांगलाच इंगा दाखवला. ग्रेटर नोएडातील हा सर्व प्रकार आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.

ग्रेटर नोएडा येथील एका खासगी विद्यापीठातील प्रोफेसर दुसरं लग्न करुन एका ठिकाणी लपून बसला होता. गेल्या एक वर्षापासून तो सुट्टी मिळत नाही असा बहाणा करुन तो एक वर्ष घरीच गेला नाही. मात्र जेव्हा पहिल्या पत्नीला त्याच्यावर संशय आला तेव्हा तिने थेट त्याचे घर गाठले. जेव्हा नवऱ्याला दुसरीसोबत पाहिले तेव्हा तिने व त्याच्या बहिणीने त्याला चांगलाच चोप दिला.

प्रोफेसरचं 2020मध्ये खुर्जा येथे राहणाऱ्या एका महिलेशी लग्न झालं होतं. दोघांना एक मुलगादेखील आहे. पीडित पत्नीने म्हटलं आहे की, गेल्या एक वर्षापासून तिचा पती घरीच येत नव्हता. जेव्हा ती त्याला याचे कारण विचारायची तेव्हा तो सुट्टी नसल्याची सबब पुढे करायचा. जेव्हा त्याच्या पत्नीला संशय आला तेव्हा तिच्या माहेरच्या मंडळींना सांगून तिने पतीचा शोध घेण्यास सुरुवात केले. मात्र तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता.

मागील बुधवारी त्याची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना त्याला शोधून काढले. तिथे पोहोचल्यावर त्यांना एकच धक्का बसला. तिथे तो दुसऱ्याच एका महिलेसोबत राहत होता. त्यानंतर पहिल्या पत्नीने व तिच्या बहिणीने नवऱ्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर या हाय वोल्टेज ड्रामानंतर पत्नीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.

पत्नी व मेव्हुणीने दिला चोप

जेव्हा प्रोफेसरच्या पत्नीने व त्याच्या मेव्हुणीने त्याला दुसऱ्याच महिलेसोबत बघितले तेव्हा त्यांना संताप अनावर झाला. त्यानंतर दोघींना मिळून त्याला मारहाण केली. त्यानंतर आता पती त्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहण्यास नकार देत आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button