राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, पत्रात संघटना दहशतवादी पैसा पुरवत असल्याचा संशय व्यक्त
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. एकीकडे मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगली आहे. याच दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
या पत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आढावा बैठक घेत आहे. कोणत्या जागी मनसेचे उमेदवार उभे करता येईल याची चाचपणी करत आहे. अशातच राज ठाकरे यांनी शिपिंग इंडस्ट्रीबाबत पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे.
शिपिंग इंडस्ट्रीमध्ये कामगार संघटनेमुळे 2 लाख सीफेरर्सची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. या संबंधित प्रकरणातील आर्थिक घोटाळा महाप्रचंड असून त्याबाबत केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलण्याची गरज असल्याचं पत्रात म्हटलं आहे. नुसी ‘ (National Union of Seafarers of India) आणि मुई (Maritime Union of India) हे दोन संघटना कामगाराचे आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप केला जात आहे.
या दोन्ही संघटना दहशतवादी पैसा पुरवत असल्याचा संशय सुद्धा त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे तसंच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.