मोबाइल बॅटरीचा स्फोट होऊन चिमुकल्याचा मृत्यू

समर्थने बॅटरी कानाला लावलेली असताना एका मुलाने खेळत-खेळत बॅटरीला वायर जोडून ती सॉकेटमध्ये लावली. यामुळे क्षणात बॅटरीचा स्फोट झाला. यात समर्थचा कान तुटून पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
भोकरदन : मोबाइलमधील बॅटरी कानाला लावून खेळताना बॅटरीचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. समर्थ परशुराम तायडे (वय ५)असे त्याचे नाव आहे.
आमठाणा (ता. सिल्लाेड)येथील परशुराम तायडे हे सोमवारी त्यांच्या परिवारासह कुंभारी (ता.भोकरदन) येथे नातेवाईकांकडे आले होते. तिथे समर्थ इतर मुलांसोबत बंद पडलेल्या मोबाइलच्या बॅटरीसोबत खेळत होते.