गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षड्यंत्र रचले काय?
लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. अशात सत्तेत असलेल्या भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत भाजप पक्षातील हायप्रोफाईल नेत्यांसह कलाकारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशात महाराष्ट्रतील भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव या यादीत नसल्यामुळे आता विरोधकांडून भाजप पक्षांवर निशाणा साधण्यात येत आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कोणतीही भीती न बाळगता स्पष्टपणे आपले मत व्यक्त प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत अनेक वेळा त्यांनी आपला हा स्पष्टवक्तेपणा सिद्ध केला आहे. अनेक वेळा पक्षाच्या धोरणाच्या विरोधात किंवा सरकारच्या धोरणाच्या विरोधात बोलण्याचे धाडसही त्यांनी दाखवले आहे. अशात पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने उद्धव ठाकरे गटातील संजय राऊत यांनी भाजपला घेरले आहे. गडकरींचे काय होणार? या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
सामना अग्रलेखात पुढील प्रमाणे
भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुंबईतील कृपाशंकर सिंहांचे नाव आहे. अनेक ऐरेगैरे यांची नावे भाजपच्या पहिल्या यादीत आहेत, पण नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत डावलण्यात आले.
नितीन गडकरी, वसुंधराराजे शिंदे, शिवराजसिंह चौहान हे भाजपचे मूळ नेते आहेत. वाजपेयी-आडवाणींच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रदीर्घ कार्य केले. देशभक्तीचा व्यापार त्यांनी होऊ दिला नाही व भाजपचे वैचारिक अधःपतन रोखण्यात या नेत्यांनी पुढाकार घेतला. या सगळय़ांचेच पंख कातरले. गडकरी तर छत्रपती शिवरायांचे निस्सीम भक्त. गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे काय?
भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी या यादीत जाहीर करण्यात आली नाही. यावरून राऊतांनी प्रश्न विचारलेत. गडकरींचे काय होणार? असा प्रश्न विचारला आहे.