कवयित्री उज्ज्वला बाळासाहेब कोल्हे यांना ‘काव्य रत्न’ पुरस्कार प्राप्त
कोपरगाव तालुका येथील कवयित्री उज्ज्वला बाळासाहेब कोल्हे ‘काव्य रत्न’ पुरस्कारान सन्मानीत
कोपरगाव तालुका येथील कवयित्री उज्ज्वला बाळासाहेब कोल्हे यांना भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाऊंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता)संरक्षण समिती राष्ट्रीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २०२४ जागो ग्राहक जागो संस्थेद्वारे ‘काव्य रत्न’ पुरस्कार उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मा.उत्तम कांबळे (जेष्ठ साहित्यिक व माजी संपादक, सकाळ वृत्तपत्र) मा.अशोकजी अव्हाड (माजी न्यायाधीश) मा.चंद्रकांतजी खांडवी (पोलीस उपायुक्त,नाशिक) मा. प्रशांत बच्छाव (पोलीस उप आयुक्त नाशिक) मा.आदिती गायकवाड (अध्यक्षा महाराष्ट्र राज्य) मा.प्रकाशजी लोंढें (नगरसेवक तथा आर पी आय जिल्हाप्रमुख) मा. मनिषजी सानप (सहायक आयुक्त, अन्न प्रशासन विभाग, नाशिक) मा.जितेंद्र निकाळे (नाशिक जिल्हा कायदेशीर सल्लागार) मा डाॅ. अविनाश झोटींग(राष्ट्रीय सचिव) मा.दादासाहेब केदारे (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उज्ज्वला कोल्हे ह्या साहित्य क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांच्या अमूल्य योगादानाबद्दल त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून साहित्य शब्दगंध समूहावर नानाविध काव्य प्रकारांची कार्यशाळा घेऊन काव्य शिकवण्याचे काम करत आहे. साहित्य शब्दगंधची ख्याती अवघ्या महाराष्ट्रात आहे. शुद्धता आणि अचूकता या दोन तत्त्वावर चालणा-या या परिवाराने आजपर्यंत समूहात अनेक नवोउपक्रम राबवले. ऑनलाईन अनेक स्पर्धा आयोजित केल्या व अगदी पारदर्शक परीक्षक नेमून निकालही पारदर्शक देण्यात येत असतो. त्यांच्या मते नुसतीच सहभागींची व साहित्यिकांची संख्या महत्त्वाची नसून गुणवत्ता महत्त्वाची आहे..
साहित्य क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण करणा-या या कवयित्रीने काव्यक्षेत्रात काव्यांजली नावाचा एक नवीन काव्य प्रकार निर्माण केला आहे. त्यांच्या अनेक काव्यांजली काव्य प्रकारातल्या रचना प्रसिद्ध आहेत. तसेच अनेक साहित्यिकांनी ह्या काव्य प्रकाराला पसंती देऊन पाहता पाहता हा काव्यप्रकार खूपच लोकप्रिय ठरला आहे. उज्ज्वला कोल्हे यांचे लिखाण अगदी वास्तविक व मनाला भिडणारे आहे. त्याचबरोबर समाजाप्रती असलेली कणव व अध्यात्माची आवड त्यांना आहे.
राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्काराबरोबरच कवयित्री कोल्हे यांना इतरही बरेच राज्यस्तरीय, एल्गार स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार, हिरकणी, साहित्यरत्न राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, साहित्य भूषण, राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार अशा अनेक छोट्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाऊंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता)संरक्षण समिती राष्ट्रीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २०२४ जागो ग्राहक जागो संस्थेद्वारे ‘काव्य रत्न’ पुरस्कार उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मा.उत्तम कांबळे (जेष्ठ साहित्यिक व माजी संपादक, सकाळ वृत्तपत्र) मा.अशोकजी अव्हाड (माजी न्यायाधीश) मा.चंद्रकांतजी खांडवी (पोलीस उपायुक्त,नाशिक) मा. प्रशांत बच्छाव (पोलीस उप आयुक्त नाशिक) मा.आदिती गायकवाड (अध्यक्षा महाराष्ट्र राज्य) मा.प्रकाशजी लोंढें (नगरसेवक तथा आर पी आय जिल्हाप्रमुख) मा. मनिषजी सानप (सहायक आयुक्त, अन्न प्रशासन विभाग, नाशिक) मा.जितेंद्र निकाळे (नाशिक जिल्हा कायदेशीर सल्लागार) मा डाॅ. अविनाश झोटींग(राष्ट्रीय सचिव) मा.दादासाहेब केदारे (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उज्ज्वला कोल्हे ह्या साहित्य क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांच्या अमूल्य योगादानाबद्दल त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून साहित्य शब्दगंध समूहावर नानाविध काव्य प्रकारांची कार्यशाळा घेऊन काव्य शिकवण्याचे काम करत आहे. साहित्य शब्दगंधची ख्याती अवघ्या महाराष्ट्रात आहे. शुद्धता आणि अचूकता या दोन तत्त्वावर चालणा-या या परिवाराने आजपर्यंत समूहात अनेक नवोउपक्रम राबवले. ऑनलाईन अनेक स्पर्धा आयोजित केल्या व अगदी पारदर्शक परीक्षक नेमून निकालही पारदर्शक देण्यात येत असतो. त्यांच्या मते नुसतीच सहभागींची व साहित्यिकांची संख्या महत्त्वाची नसून गुणवत्ता महत्त्वाची आहे.. साहित्य क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण करणा-या या कवयित्रीने काव्यक्षेत्रात काव्यांजली नावाचा एक नवीन काव्य प्रकार निर्माण केला आहे. त्यांच्या अनेक काव्यांजली काव्य प्रकारातल्या रचना प्रसिद्ध आहेत. तसेच अनेक साहित्यिकांनी ह्या काव्य प्रकाराला पसंती देऊन पाहता पाहता हा काव्यप्रकार खूपच लोकप्रिय ठरला आहे.
उज्ज्वला कोल्हे यांचे लिखाण अगदी वास्तविक व मनाला भिडणारे आहे. त्याचबरोबर समाजाप्रती असलेली कणव व अध्यात्माची आवड त्यांना आहे.