मन विचलित करणाराVIDEO ; डॉक्टर फोनवर होते, तो आला आणि मानेवर केले 19 वार अन…

नाशिक : जिल्ह्यात एका रुग्णालयात डॉक्टरवर जीवघेणा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. हा हल्ला रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
ज्यात हल्लेखोराने डॉक्टरवर तब्बल 19 वार केल्याचं दिसतं आहे. मन विचलित करणारं असं हे दृश्य आहे.
नाशिकच्या पंचवटीतील सुयश हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. इथं डॉक्टरवर हल्ला करण्यात आला आहे. कैलास राठी असं या डॉक्टरचं नाव आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता डॉक्टर खुर्चीवर बसले आहेत. समोर एक व्यक्ती उभी आहे. या व्यक्तीने मागे हातात कोयता धरला आहे. डॉक्टर फोनवर बोलण्यात व्यस्त आहेत. हीच संधी साधत व्यक्ती कोयता काढतो आणि डॉक्टरवर सपासप वार करत जातो.
व्हिडिओ पहा👇👇👇
सुरुवातीला तो मानेवर वार करतो. त्यानंतर गळ्यावर वार करतो. असं करत सपासप 19 वार तो करतो आणि नंतर तिथून निघून जातो. डॉक्टर तिथंच रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसतात. इतके वार केल्यानंतरही सुदैवाने डॉक्टर जिवंत राहिले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
डॉ. राठी हॉस्पिटलमध्ये असताना एक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आली. त्यावेळी डॉ. राठी आणि त्या व्यक्तीमध्ये यांच्यात बोलणं झालं. काही वेळाने पुन्हा दुसऱ्या कॅबिनमध्ये दोघंही चर्चा करण्यासाठी गेले. त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला, त्यावेळी त्या व्यक्तीने केबिनची कडी लावून धारदार कोयता काढून डॉ. राठी यांच्या डोक्यावर तसेच मानेवर वार केले, अशी माहिती आहे.