उन्हाळी हंगामातीतील सुर्यफूल पिकांची पेरणी कशी करावी?
पेरणीकरिता सुधारित वाणामध्ये फुले भास्कर,भानू, एस एस ५६,तर संकरीत वाणा मध्ये KBSH 44,फुले रविराज ,MSFH 17 या वाणांची निवड करावी
मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रम थायरम किंवा ब्रासिकॉल प्रति किलो बियाण्यास चोळावे.केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रम अॅप्रोन ३५ एस डी. प्रति किलो बियाण्यास चोळावे तसेच विषाणूजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रीड ७० डब्लू ए गाऊचा ५ ग्रम प्रति किलो बियाण्यास चोळावे त्यानंतर अॅझोटोबॅकटर २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
उन्हाळी हंगामातील पेरणीची योग्य वेळ अतिशय महत्वाची असते. उन्हाळी पिकांची पेरणी लवकर केल्यास त्याचा पीक उगवणीवर व पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होता,तर पिकांची पेरणी उशिरा झाल्यास अतिउष्णतेचा विपरीत परिणाम फुलोऱ्यावर तसेच दाणे भरण्यावर होऊ शकतो. तसेच मे महिन्याच्या शेवटी होणाऱ्या अवकाळी पावसात काढणीच्या वेळी पीक सापडू शकते म्हणून उन्हाळी हंगामातील पिकांची योग्य वेळी पेरणी करणे आवश्यक आहे.
उन्हाळी सूर्यफुल
उन्हाळी हंगामातील लागवडीकरिता फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा ही पेरणीची उत्तम वेळ आहे. मध्यम खोल जमिनीत 45 x 30 से.मी व भारी जमिनीत 60 X 30 से.मी तसेच संकरीत आणि जास्त कालावधीच्या वाणांची 60 X 30 से.मी. अंतरावर पेरणी करावी पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी,म्हणजे बी व खत एकाच वेळी पेरता येते.बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकन पद्धतीने करावी.पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८ ते १० किलो /हेक्टरी तर संकरीत वाणाकरिता ५ ते ६ किलो /हेक्टरी बियाणे वापरावे.
पेरणीकरिता सुधारित वाणामध्ये फुले भास्कर,भानू, एस एस ५६,तर संकरीत वाणा मध्ये KBSH 44,फुले रविराज ,MSFH 17 या वाणांची निवड करावी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रम थायरम किंवा ब्रासिकॉल प्रति किलो बियाण्यास चोळावे.केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रम अॅप्रोन ३५ एस डी. प्रति किलो बियाण्यास चोळावे तसेच विषाणूजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रीड ७० डब्लू ए गाऊचा ५ ग्रम प्रति किलो बियाण्यास चोळावे त्यानंतर अॅझोटोबॅकटर २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.