जरांगे मराठा समाजाला विश्वासात घेत नव्हते, तर त्या फोनला विश्वासात घ्यायचे हा फोन शरद पवारांचा….
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारच का असे पत्रकारांनी विचारले असता, संगीता वानखेडे म्हणाल्या, जरांगेंनी ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा लढा उभारला तेव्हा त्यांना सर्वपक्षीय नेते भेटायला गेले होते. मात्र यांनी कोणत्याच पक्षाच्या नेत्याबाबत मनापासून प्रतिक्रिया दिली नाही. पण ज्यावेळेस शरद पवार आंदोलनस्थळी गेली, त्यावेळेस त्यांच्याबाबत जी आत्मियता होती, जे प्रेम उफाळून येत होते, ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले असल्याचे संगीती वानखेडे यांनी सांगितले. त्यामुळेच या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे.
मराठा सहकारी संगीता वानखेडेने (sangita Wankhede) जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केला. जरांगे मराठा समाजाला विश्वासात घेत नव्हते, तर त्या फोनला विश्वासात घ्यायचे. हा फोन शरद पवारांचा (Sharad Pawar) असल्याचा गंभीर आरोप महिलेने केला. या आंदोलनाचा खर्च देखील शरद पवारांनीच केल्याचा गौप्यस्फोट संगीता वानखेडे यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संगीता वानखेडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केला आहे. ‘हा लढा आरक्षणासाठी उभारला होता. मग आता स्वतंत्र आरक्षण मिळालंय, कायद्यात टीकून राहणारा आरक्षण मिळालंय, ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनाही ओबीसीतून आरक्षण मिळतेय ना, मग हा अट्टाहास कशासाठी? असा खडा सवाल यावेळी संगीता वानखेडे यांनी उपस्थित केला.
‘मी मराठा समाजाची सहकारी होते. जो मराठा समाजासाठी आवाज उठवेल त्याच्यासाठी मी स्वत: उभी राहायची असे संगीता वानखेडेने सांगितले. तसेच ‘मी एक महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत होते. हा माणूस चुकतोय, समाजाची दिशाभूल करतोय, समाजाला गोंधळात टाकतोय, त्यामुळे याचा चेहरा आता समाजापुढे आला पाहिजे, यासाठी मी माध्यमांसमोर आल्याचे’ संगीता वानखेडे सांगतात.
‘जरांगेंनी महाराष्ट्राला वेड बनवलं आहे. अंतरावली सराटीत दंगल घडली की घडवली गेली, याचा सरकारने शोध घ्यावा’, असा संशय देखील संगीता वानखेडेंनी व्यक्त केला. तसेच ‘जरांगे मराठा समाजाला अजिबात विश्वासात घेत नव्हते, ते फक्त त्या एका फोनलाच विश्वासात घ्यायचे, शरद पवारांचाच फोन त्या माणसाला यायचा, आंदोलनाचा खर्चही शरद पवारांनीच केला होता’, असा खळबळ उडवून टाकणारा आरोप देखील संगीता वानखेडे यांनी केला.