Video प्रचारासाठी कायपण! प्रमुख राजकीय पक्षांनी कंडोमच्या पाकिटांवर छापली पक्षाची चिन्हे
आंध्र प्रदेशातून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर येत आहे. ती वाचून तुमचे डोके चक्रावून जाईल. कारण राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी कंडोमची मदत घेतली आहे.
दोन्ही प्रमुख पक्ष त्यांच्या पक्षाचे चिन्ह छापलेले पॅकेट जनतेला वितरित करताना दिसत आहेत.
आंध्र प्रदेशातील या घडामोडींवरून दिसून येते की, आता कंडोमही निवडणुक प्रचाराचे साधन बनले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्ष आणि आघाडीचा विरोधी पक्ष, तेलगू देसम पार्टी या दोन्ही पक्षांच्या चिन्हे छापलेले कंडोमचे पाकिट दिसत आहे. जे कथितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे मतदारांना वाटले जात आहेत.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या कशी कमी करता येईल यावर चर्चा करताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी घरोघरी प्रचार करणारे पक्षाचे नेते कंडोमची पाकिटेही वाटप करत होते.
दोन्ही पक्ष हेच करत असले तरही त्यांनी कंडोम वाटप केल्याबद्दल एकमेकांना सोशल मीडियावरून फटकारले आहे.
वायएसआरसीपी, ट्विटरवर एक पोस्ट करत तेलगू देसम पक्षाला फटकारत म्हटले की, त्यांचा पक्ष आणखी किती खालची पातळी गाठणार आहे?
“हे कंडोम वितरण थांबेल की, लोकांना पुढे व्हायग्राचे वितरण करणार आहात?” असे जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने विचारले.
प्रतिसादात, तेलगू देसम पक्षाने YSRCP लोगोसह एका कंडोमचे पॅक पोस्ट केले आणि विचारले की, ही तयारी आहे का ज्याबद्दल तुमचा पक्ष बोलत आहे.
व्हिडिओ पहा
👇👇👇👇
https://x.com/Jay_Apoorva18/status/1760314739358310626?t=b8Yi9q-gZUXY144pHleWHA&s=09
.