राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती सर्व शाळा व कार्यालयात साजरी करावी
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती सर्व शाळा व कार्यालयात साजरी करावी; शिवसेना उपजिल्हाप्रमुख युवा नेते अजय जाधव यांचे आवाहन
बीड : राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी १४८ वी जयंती जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख युवा नेते अजय जाधव यांचे आवाहन यांनी केले.
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी दीडशे वर्षापूर्वी स्वच्छतेचे महत्व पटवून देवून ते आचरणात आणले होते. आज त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे. घर स्वच्छ तर परिसर स्वच्छ, गाव स्वच्छ तर देश स्वच्छ हे ब्रिद राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी समाजाला पटवून दिले. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. त्यांचा महिमा वर्णावा तितका कमीच आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा स्वतः हातात झाडू घेवून स्वच्छता मोहीम चालू केली आहे. आज प्रत्येक गावात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले व प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम चालू आहे. आज शासनाच्यावतीने संत गाडगे बाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या नावाने ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जातो. आज प्रत्येक शाळेत शिक्षक विद्याथ्यांना स्वच्छतेचे धडे देत असतात. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे पालन करावे, आपले घर व आपला परिसर तसेच शाळा स्वच्छ ठेवावी इत्यादी बाबत मार्गदर्शन करतात. राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाची सेवा करण्यात
व्यतित केले असून त्यांच्या विचारांची आज खरी गरज समाजाला पटू लागली आहे. त्यामुळे अशा आदर्श राष्ट्रसंतांचे विचार घरघरात पोहचण्याची खरी गरज आहे. त्यामुळे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती जिल्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयात कोरोना महामारी संदर्भात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरी करण्यात यावी असे आवाहन
शिवसेना उपजिल्हाप्रमुख युवा नेते अजय जाधव, अॅड. सुधीर जाधव, कार्याध्यक्ष गणेश जगताप, शहराध्यक्ष अंबादास नवले, श्रीमंत गोतावळे, जिल्हा सचिव प्रविण साळुंके, रमेश घोडके, पप्पु शिंदे, विलास जाधव, रवि जाधव, जगन्नाथ शिंदे, शहर उपाध्यक्ष शितल राऊत, युवा शहराध्यक्ष मंगेश घोडके, प्रा. विजय जाधव, संजय साळुंके, संतोष पवार, जीजा शिंदे, अतुल साळुंके, रवि जाधव, जयंत राऊत, गणेश राऊत, कुणाल साळुंके, किरण साळुंके, अजय जाधव, मनोज नवले, संजय नवले, विक्रम जाधव, संतोष भालेकर, अमोल काळे यांनी केले आहे.