आमरण उपोषण मागे,आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचेआदेश
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व नगरपरिषदेच्या मिळालेल्या सकारात्मक पत्रामुळे
मी माझे आमरण उपोषण मागे घेत आहे
जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना येत्या आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे दिले आदेश
बीड : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्त्या मधील सुधारणा योजनेमधील कामात मोठा भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची उच्वस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी व संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करण लोंढे यांचे जिल्हाधिकारी कार्यासमोर दि 16/02/2024 ते 20/02/2024 पाच दिवसापासून आमरण उपोषण चालू होते
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व नगरपरिषदेच्या मिळालेल्या सकारात्मक पत्रामुळे मागे घेत आहे वार्ड क्रमांक ३ मध्ये डॉक्टर कॉलनी या ठिकाणी नगर परिषद बीडच्या वतीने सन २०२२-२३ मध्ये करण्यात आलेले काम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नागरिक सुधार योजना अंतर्गत करण्यात आलेले आहे परंतु अनु जाती व नवबौद्ध यांची ५०% किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अथवा अनु.जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागामध्येच करावीत
आदेश असतानाही डॉकटर कॉलनी या ठिकाणी अनु जाती व नवबौद्ध यांची संख्या १% टक्काही नाही तरीही त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नागरिक सुधार योजना अंतर्गत रस्त्याचे व नाली काम करण्यात आलेले आहेत करण्यात आलेली कामे दलित वस्ती नसलेल्या भागात करण्यात आली असून ही कामे बोगस आहेत. वार्ड क्र. 4 मधील कामे, वार्ड क्र. 18 मध्ये काम केलेले आहे. वास्तविक वार्ड क्र. 18 मध्ये एकाही कामाची मंजुरी नसतांना वार्ड क्र. 18 मध्ये काम केल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा पध्दतीने अनेक ठिकाणची कामे शासनाच्या नियमानुसार नाही, वार्ड क्र. 18 मध्ये 1) आकाश गायकवाड यांच्या घरापासून ते संतोष जाधव यांच्या घरापर्यंत, 2) भाभी किराणा दुकाना पासून ते लक्ष्मण गुंजाळ (गांधीनगर) यांच्या घरापर्यंत ही कामें वार्ड क्र. 4 ची कामे आहेत, परंतू सदर कामे वार्ड क्र. 18 मध्ये वळवण्यात आलेली आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्त्या मधील सुधारणा योजनेमधील कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकान्यावर योग्य कारवाई कराठी व संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे. सदरील कामाची चौकशी न केल्यास न्यायालयीन लढाई लढणार !!
असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे