वधू आणि तिची बहिण नवरदेवाला जबरदस्ती डान्स करायला लावते,त्यानं रागात जे काही केलं ते धक्कादायक
लग्नातील प्रत्येक क्षण खास असावा असं प्रत्येक कपलला वाटत असतं. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या लग्नात काहीतरी खास गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरुन त्या आयुष्यभर लक्षात राहतील.
बऱ्याचदा अशा गोष्टी करण्याच्या नादात भलत्याच गोष्टी घडतात आणि वधू वरामध्ये भांडण होतं. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलाय, ज्यामध्ये वधू आणि तिची बहिण नवरदेवाला जबरदस्ती डान्स करायला लावते. मात्र पुढच्याच क्षणी नवरदेवाला राग येतो आणि तो त्या दोघींसोबत विचित्र गोष्ट करतो.
नवरदेवाला जबरदस्ती नाचवल्याचा राग आला आणि त्यानं रागात जे काही केलं ते धक्कादायक होतं. पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. लग्नातील हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
लग्नातील समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्वजण नाचत आहेत. नवरीची बहिण नवरदेवाला नवरीसोबत नाचण्याचा आग्रह करते. नंतर नवरीही नवरदेवाला जबरदस्ती नाचायला लावते. नको म्हणूनही नाचायला लावल्यामुळे नवरदेवाला राग येतो. रागाच्या भरात नवरदेव वधूला ओढत, फिरवत नाचवतो. ती खाली पडली तरी तिला उठवून तिला नाचवतो.
व्हिडिओ पहा
👇👇👇👇
This is what happens when reels become more important than real
😂😂😂😂😂😂 pic.twitter.com/zLhJXUPqZ3— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) February 19, 2024
नंतर सर्वजण त्याला पकडतात. वधूची बहिण नवरदेवाला समजवायला जाते तर तो तिलाही ओढून डान्स करतो. बाकीचे सर्वजणही शॉक झाल्याचं पहायला मिळतंय. मात्र हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी असा व्हिडीओ बनवल्याचं म्हटलं जातंय. मात्र हा व्हिडीओ काहीच वेळात व्हायरल झाला.
@HasnaZaruriHai नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 40 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरलं नाही. अनेक मजेशीर कमेंट या व्हिडीओवर येताना पहायला मिळत आहेत.