सरकार देत आहे दरमहा 300 युनिट मोफत वीज, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ दिला जातो. या संदर्भात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याअंतर्गत दरमहा 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. याचा फायदा एक कोटी घरांना देण्यात येणार आहे. अशातच जर तुम्ही देखील पात्र असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. यासाठी कसा करायचा अर्ज, हे जाणून घेऊ.
तुम्ही याप्रमाणे अर्ज करू शकता:
स्टेप 1
सर्वातआधी तुम्हाला अधिकृत पोर्टल https://pmsuryaghar.gov.in/ वर जाऊन वीज वितरण कंपनी निवडावी लागेल.
त्यानंतर वीज वितरण क्रमांक निवडा आणि मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरा. (Latest Marathi News)
स्टेप 2
यानंतर तुम्हाला ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून लॉग इन करावे लागेल.
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला रुफटॉप सोलरसाठी अर्ज करावा लागेल.
मग तुम्हाला मंजुरीची प्रतीक्षा करावी लागेल.
स्टेप 3
इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांटचे तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
अर्ज केल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
आता तुमच्या डिस्कॉममधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट इन्स्टॉल करा.
स्टेप 4
यानंतर तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल.
तुम्हाला ही रिपोर्ट मिळाल्यावर, तुमच्या बँक खात्याची माहिती त्यात प्रविष्ट करा. यात तुमचे बँक खाते क्रमांक आणि कॅन्सल चेक पोर्टलवर सबमिट करा.
त्यानंतर 30 दिवसांच्या आत सबसिडी तुमच्या बँक खात्यात प्राप्त होते.