देश-विदेशधार्मिकव्हिडिओ न्युजसंपादकीय

Video १३ वर्षांच्या मुलीला झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार दर्ग्याजवळील भूमीमध्ये सापडली श्रीकृष्णाची मूर्ती !


व्रत्तसंस्था

उत्तरप्रदेश : शाहजहापूर येथील सफोरा गावात विनोद सिंह यांच्या १३ वर्षांच्या पूजा नावाच्या मुलीच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले.

तसेच एका दर्ग्याच्या भूमीमध्ये देवाची मूर्ती पुरण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार पूजाच्या कुटुंबियांनी त्या ठिकाणी उत्खनन केले असता भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सापडली.

व्हिडिओ पहा

👇👇👇👇

सौजन्य : sanatan samachar

१. पूजाने जेव्हा कुटुंबीयांना भगवान श्रीकृष्णाने स्वप्नामध्ये मूर्तीविषयी माहिती दिल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे पूजाने १० दिवस खाणे-पिणे बंद केले. शेवटी घरच्यांना पूजाचे म्हणणे मान्य करावे लागले.

२. पूजाच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून तिचे वडील विनोद सिंह पूजाला घेऊन गावकर्‍यांसमवेत दर्ग्याजवळ पोचले. स्वप्नात ज्या ठिकाणी त्याने मूर्ती पाहिली होती त्या जागेजवळ पूजाने रेष आखली. हे ठिकाण दर्ग्यापासून ३० मीटर अंतरावर आहे. तेथे प्रथम पूजा करून खोदकाम करण्यास आरंभ करण्यात आला. याची माहिती मिळताच दर्ग्याचा व्यवस्थापक महंमद आमिर उपाख्य गुड्डू मिया हाही तेथे पोचले. त्याने खोदकामाला विरोध केला. या वेळी बराच वेळ वाद झाला; मात्र वादाच्या वेळी खोदकाम चालूच होते. अनुमाने ३ फूट खोदल्यानंतर १ फूट उंचीची प्राचीन श्रीकृष्ण मूर्ती सापडली.

३. विनोद सिंह यांनी दर्ग्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या शेतात मूर्तीची स्थापना केली. यानंतर लोक मूर्तीची पूजा करू लागले. येथे दर्शनासाठी गर्दी होऊ लागल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. उपजिल्हादंडाधिकारी अंजली गंगवार यांनी सांगितले की, या मूर्तीचे पुरातत्वीय महत्त्व तपासले जाणार आहे.

४. एस्.एस्. कॉलेजच्या इतिहास विभागाचे अध्यक्ष विकास खुराना यांनी सांगितले की, ही तांब्याची मूर्ती गुप्त काळातील असल्याचे दिसते. ७ व्या शतकात अशा मूर्ती बनवल्या जात होत्या. पुरातत्व तपासणीनंतर सर्व काही स्पष्ट होईल.

संपादकीय भूमिका

या दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी हिंदूंचे मंदिर होते का ? याचीही आता पडताळणी करणे आवश्यक आहे. या संदर्भात हिंदु संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button