अकाऊंटमध्ये झिरो बॅलेन्स, हाताने काढू लागला पैसे, Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात जुगाड व्हिडीओचीही कमी नाही. किती तरी लोक जुगाड करतात आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
हा जुगाड तुम्ही याआधी कुठेच पाहिला नसेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही एका तरुणाने त्याच्या बँक अकाऊंटमध्ये एकही पैसा नसताना एटीएममधून पैसे मिळवले आहेत.
एटीएममध्ये पैसे काढायचे असतील तर त्यासाठी बँक अकाऊंटमध्ये पैसे असणं गरजेचं आहे. बँक अकाऊंटमध्ये एकही पैसा नसेल आणि तुम्ही एटीएएममधून पैसे काढायला गेलात तर झिरो बॅलेन्स दाखवणारी एक स्लिप त्यातून बाहेर येईल, ना की पैसे. पण या तरुणाने अशी काही शक्कल लढवली की त्याने झिरो बँक बॅलेन्स असताना एटीएममधून पैसे काढले आहेत. आता ते कसं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
व्यक्तीला मिळालं पैशाचं झाड, हाताने काढू लागला पैसे, Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Ye technique india se bahar nahi jaani chahiye . 😭 pic.twitter.com/tqREmxj6Bq
— Hunटरर ♂ (@nickhunterr) February 17, 2024
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, दोन मुलं दिसत आहेत. एक एटीएमबाहेर उभा राहतो, एक एटीएममध्ये कार्ड घेऊन जातो. त्याने एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर एक स्लिप बाहेर येते, ज्यात झिरो बॅलेन्स असं दिसतं. तरुण ते कॅमेऱ्यासमोर दाखवतो. आता यानंतर तो असं काही करतो की तुम्ही विचारही केला नसेल. बँकेत पैसे नाहीत हे समजलं तरी तो एटीएममध्ये कार्ड टाकत राहतो आणि एटीएममध्ये येणाऱ्या स्लिप जमा करतो. शेवटी जेव्हा तो एटीएममधून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या हातात स्लिपने भरलेली पिशवी असते. ती घेऊन ते दोघंही रद्दीच्या दुकानात जातात. तिथं या स्लिप विकतात. त्यांना याचे 20 रुपये मिळतात. यानंतर दोघंही त्या पैशात चहा पितात.
@nickhunterr नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. चहासाठी इतकी मेहनत अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे तर या देशात किती तेजस्वी तरुण आहेत, असं म्हणत एका युझरनं यांचं कौतुक केलं आहे.
सूचना – हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ म्हणून दाखवण्यात आला आहे. तुम्ही असं काही करू नका. असं कृत्य करण्यास लोकशाही न्यूज24 मराठी प्रोत्साहित करत नाही. असे व्हिडीओ दाखवून या कृत्याला प्रोत्साहन देणं हा उद्देश बिलकुल नाही.