नोकरीची संधी; यूनियन बँक, MahaTranscoc मध्ये ७३६ जागांसाठी भरती
तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँकेत आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड येथे भरती केली जात आहे.
युनियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती
युनियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती केली जात आहे. बँकेने (Bank) अधिकृत वेबसाइटवर (Website) याबाबत माहिती दिली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी तब्बल ६०६ जागांवर भरती करण्यात येणार आहे. युनियन बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट ऑफिसर भरती २०२४ साठी ऑनलाइन अर्ज ३ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झाले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ आहे.
युनियन बँकेत अर्ज करण्यासाठी ओपन, ओबीसी, EWAS या श्रेणींसाठी ८०० रुपये अर्ज फी आहे. तर अनुसूचित जाती, जमाती आणि PWD साठी अर्ज शुल्क १७५ रुपये ठेवण्यात आले आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरु शकतात. यासाठी बँकेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MahaTransco) येथे असिस्टंट इंजिनियर पदांसाठी एकूण १३० जागांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरु शकतात. अर्ज भरण्यासाठी इच्छूक उमेदवारांना https://www.mahatransco.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड येथे असिस्टंट इंजिनियर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे इंजिनियरिंग डिप्लोम किंवा इलेक्ट्रिरल इंजिनियरिंगमध्ये बॅचलर शिक्षण असणे महत्त्वाचे आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारंना ७०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे तर राखीव जाती यांच्याकडून ३५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.