महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी ठिकाण: लोणार सरोवरचं कोडं सोडवण्यात NASA चे वैज्ञानिकही फेल,विहिरीचं अर्धं पाणी गोडं आणि अर्धं पाणी खारं
भारतातील महाराष्ट्रात असलेले लोणार सरोवर हे पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. लोणार सरोवर म्हणजे पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कारच आहे. बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर हे एक अद्वितीय आणि रहस्यमय नैसर्गिक आश्चर्य आहे. 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे अग्निजन्य खडकात निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचे हे जगातील एकमेव सरोवर आहे.
उल्कापातामुळे तयार झाले लोणार सरोवर
लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झाले आहे. लोणार सरोवर हे 47000 हजार वर्ष जुनं असल्याचा संशोधकांचा दावा आहे. एक महाकाया उल्का दख्खनच्या पठारावर धडकली. त्याठिकाणी 1.8 किलोमीटर व्यासाचा आणि 150 मीटर खोल असा प्रचंड खड्डा तयार झाला. या सरोवराला पौराणिक महत्व देकील आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये जे. ई. अलेक्झांडर यानं या सरोवराची नोंद केली आहे. त्याचबरोबर आईने अकबरी, पद्मपुराण आणि स्कंदपुराणातही या विवराचा उल्लेख आढळतो.
खाऱ्या पाण्याचे सरोवर
लोणार हे उल्कापातापासून तयार झालेलं सरोवर आहे. चंद्रावरील मातीचं या खाऱ्या पाण्याच्या गुणधर्माशी जवळचं नातं असल्याचं, जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. या सरोवराचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी जगाच्या कोनाकोपऱ्यातून इथे संशोधक नेहमी येतात. लोणार सरोवर परिसरात सातत्याने भूगर्भीय, पुरातत्त्व, पर्यावरण आणि आंतराळिकदृष्ट्या संशोधन केले जाते. लोणार सरोवर परिसरात अनेक प्रकारचे दुर्मीळ खडक, खनिज, काचमनी, पाण्यावर तरंगणारे दगड सापडतात. लोणार सरोवराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील क्षारांचे प्रमाण, आम्लारी गुणधर्म म्हणजेच सरोवराच्या पाण्याची पीएच लेव्हल इतकी जास्त असूनही याच्या बाजूला घेतलेल्या छोट्याशा खड्ड्यात मात्र गोड पाणी मिळते. या पाण्यात कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही परंतु यात विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू, हरितनील शेवाळ आहेत NASA च्या वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उलगडता आलेले नाही. येथे एक सासू सूनेची विहीर म्हणून ही ओळखली जाणारी पुरातन विहीर देखील आहे. या विहिरीचं अर्धं पाणी गोडं आणि अर्धं पाणी खारं असतं. संपूर्ण तलावात मिठासारखं खारं पाणी मात्र या विहीरीत अर्धं पाणी गोड असल्यानं हा एक निसर्गाचा चमत्कार समजला जातो.