आता मृत्यूची तारीख आणि वेळ आधीच कळणार, नवा AI डेव्हलप
कंटेंट लिहिणे आणि फोटो तयार करण्याशिवाय आता आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर इतर अनेक गोष्टींमध्ये होत आहे. आता स्मार्टफोनमध्येही AI चा वापर वाढत आहे. पण आता माणसाने असे AI टूल तयार केले आहे की तो माणसाच्या मृत्यूची तारीख सांगू शकेल.
डेनमार्क युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी AI आधारित डेथ प्रेडिक्टर विकसित केला आहे. जो अचूकतेने व्यक्तीच्या आयुष्याचा अंदाज लावू शकतो.
कसा काम करतो Life2vec AI?
डेन्मार्कच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी (DTU) मधील संशोधकांनी हा डेथ प्रेडिक्टर AI विकसित केला आहे. संशोधकांचा असा दावा आहे की, तो 78 टक्के अचूक माणसाच्या आयुर्मानाचा अंदाज लावू शकतो. या सिस्टिमचे नाव AI Life2vec असे आहे आणि ते ChatGPT नुसार डिझाइन केले आहे. सिस्टिम भविष्यवाणीसाठी माणसाच्या आरोग्य, शिक्षण, व्यवसाय आणि उत्पन्न यासारख्या वैयक्तिक माहितीचा वापर करते.
78 टक्के अचूक मृत्यूचे भाकीत
डेन्मार्कमधील लोकसंखेचा डेटा वापरून हे मॉडेल त्याच्या अचूकतेला रिफायन करते. एआय मॉडेलने 2008 ते 2020 पर्यंत 6 दशलक्ष लोकांच्या आरोग्य आणि श्रम मार्केटच्या डेटाचे विश्लेषण केले. या विश्लेषणानंतर मृत्यूचा अंदाज बांधताना 78 टक्के अचूक अंदाज बांधला आहे.
ChatGPT तंत्रज्ञानाचा वापर
डिसेंबर 2023 च्या “युजिंग सिक्वेन्स ऑफ लाइफ इव्हेंट्स टू प्रोडक्ट ह्युमन लाइव्ह्स” या अभ्यासाचे प्रमुख लेखक सुने लेहमन यांनी न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांच्या आधारे मानवी जीवनाचे विश्लेषण करण्यासाठी ChatGPT च्या टेक्नीकचा वापर केला जातो.