शहरातून निघालेल्या फेरीमुळे शहरभर गर्दी ,हेलिकॉप्टर अन् जेसीबीतून पुष्पवृष्टी
बीड : निर्णायक इशारा सभेपूर्वी शहरातून श्री. जरांगे पाटील यांची शहरातून निघालेल्या फेरीमुळे शहरभर गर्दी जमली. जागोजागी फेरीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. फेरीत २०१ जेसीबींमधून तर सभास्थळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
१२ वाजता सुरु झालेली फेरी साडेतीन वाजता सभास्थळी पोचली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला श्री. जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादनानंतर फेरीची सुरुवात झाली. माळीवेस, सुभाष रोडमार्गे फेरी अण्णा भाऊ साठे चौकात पोचली. या ठिकाणी अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
या ठिकाणी श्री. जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान, धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्याच्या छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात पाटील मैदानावर झालेल्या सभेला जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातूनही समाज बांधवांनी उपस्थिती लावली.
सभास्थळी जागा न भेटलेले धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौफळ्यावर उभारल्याने सभाकाळात वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली. सभास्थळी तांदळाची खिचडी, शाबू खिचडी व पाण्याची सोय करण्यात आली होती. शहरातही विविध ठिकाणी फेरीतील सहभागींच्या चहा- पाण्याची सोय करण्यात आली होती.
Video कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने राज्य सरकार अलर्ट मोडवर; आरोग्य यंत्रणांना दिले निर्देश