प्रजासत्ताक दिनी जगातील ‘हा’ शक्तिशाली नेता भारताचा प्रमुख पाहुणा
प्रजासत्ताक दिनाची तयारी देशात सुरू झाली आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तालीम दिल्लीच्या राजपथावर सुरू झाली आहे.
यावेळी प्रजासत्ताक दिनी जगातील शक्तिशाली नेते आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
पुढील वर्षी जानेवारी २०२४ मध्ये होणार्या क्वाड लीडर समिटचे आयोजन करण्याचा एक भाग म्हणून भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते, परंतु काही कारणांमुळे त्यांना शक्य नव्हते. म्हणून त्यांनी असमर्थता व्यक्त केली होती.
यानंतर प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना भारताकडून आमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून जुलै महिन्यात फ्रान्सला गेले होते. येथे मोदी बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी झाले होते आणि दोन्ही नेत्यांमध्ये भेट आणि संभाषण झाले.
बॅस्टिल डे सोहळ्यात पंतप्रधान मोदी सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. सूत्रांच्या माहितीनुनसार, २०२४ च्या शेवटी भारतात क्वाड समिट आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.
https://www.navgannews.in/crime/36782/