धार्मिक

नवीन वर्षात राशीनुसार करा महादेवाचा अभिषेक, मिळेल भाग्याची साथ


नवीन वर्ष सोमवारपासून (New Year 2024) सुरू होत आहे. सोमवार हा महादेव शंकराला समर्पित आहे, म्हणून या दिवशी भोले शंकर आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते.

भगवान भोलेनाथ अत्यंत दयाळू आणि शिघ्र प्रसन्न होणारे देवता आहेत. म्हणूनच फक्त अभिषेक केल्यानेही महादेवाची कृपा प्राप्ती होते. महादेवाचा आशीर्वाद ज्याच्यावर असतो तो रंकाचाही राजा होतो. जर तुम्हालाही नवीन वर्षात भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या राशीनुसार महादेवाला अभिषेक करा.

राशीनुसार असा करा अभिषेक

मेष – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गंगाजलात मध आणि सुगंध मिसळून महादेवाला अभिषेक करावा.

वृषभ – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा.

वृश्चिक – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी गंगाजलात सुगंध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.

धनु – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी गंगाजलात बेलपत्र आणि दुर्वा मिसळून महादेवाला अभिषेक करावा.

मकर – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.

कुंभ – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी गंगाजलात पांढरे फुल टाकून भगवान शिवाला अभिषेक करावा.

मिथुन – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी पाण्यात दुर्वा मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.

कर्क – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी तिन्ही जगाचा स्वामी असलेल्या महादेवाला कच्च्या दुधात गंगाजल मिसळून अभिषेक करावा.

सिंह – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी भगवान शिवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा.

कन्या – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी गंगाजलात बेलपत्र आणि भांगाची पाने मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.

तूळ – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी भगवान शिवाला शुद्ध तुपाचा अभिषेक करावा.

मीन – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी कच्च्या दुधात बेलपत्र किंवा भांगाची पाने मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button