आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला चिरडले.
ठाणेः एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडिता गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे.
घोडबंदर येथे राहणाऱ्या पीडित महिला या उच्चशिक्षित आहेत. या महिलेला सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजेच्या सुमारास तिचा प्रियकर अश्र्वजित गायकवाड याने ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले. महिला तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यात काही वाद झाले. आरोपी अश्र्वजित गायकवाड याने आपल्या प्रेयसीला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच तिच्या डाव्या हाताला देखील चावा घेतला. आरोपीचा मित्र असलेल्या रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी देखील चारचाकी गाडी पीडितेच्या अंगावर घातली. या घटनेत पीडितेच्या पायाला जबर मारहाण झाली असून शरीरावर जखमा झाल्या आहेत. संबंधित घटनेप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Son of top IAS bureaucrat Anil Gaikwad's son Ashwajit is accused of ordering run over of his car on alleged girlfriend Priya Singh in Thane. Badly bruised Priya with a broken leg is recovering in a local hospital. The incident happened on Monday & Priya wrote a post on gaining… pic.twitter.com/VFZDchvNPb
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) December 16, 2023
पीडिताने सांगितले आहे की, गेल्या साडेचार वर्षांपासून माझे अश्वजीत गायकवाड सोबत प्रेम आहे. मात्र मला माहिती नव्हती की तो विवाहित आहे. मला त्या रात्री माहिती पडले की, तो विवाहित आहे. या अगोदर त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. मी त्याला भेटण्यासाठी सांगितले. त्या ठिकाणी त्याची पत्नी सोबत होत्या. माझ्या बरोबर त्याने वाद घातला. माझ्यावर हल्ला केल्यानंतर माझ्या शरीरावर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी त्यावेळेस कोणतीही कारवाई केली नव्हती. माझ्या इंस्टाग्राम पोस्टमुळे आता कुठे पोलिस जागी झाली आहेत, अशी माहिती पीडित महिलेने दिली आहे.
कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेने पुन्हा जबाब नोंदवण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने देखील पोलिस पुन्हा जवाब नोंदवून घेणार आहेत. तसेच या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच त्या ठिकाणी असणारे साक्षीदार यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. संबंधित प्रकरणातील तीनही आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कसारवडवली पोलिस करत आहेत, अशी प्रतिक्रिया ठाण्याचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.