ताज्या बातम्या

आईकडे 5 हजार रुपये मागीतले आईचा नकार अन पोटच्या पोरानेच केली आईची हत्या


उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक तरुण सुटकेस घेऊन फिरत असताना पोलिसांना आढळून आला होता. त्यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना त्याचा संशय आला म्हणून त्याची चौकशी करायला सुरुवात केली.

पोलिसांनी विचारपूस करताच तो घाबरल्याचे दिसून आले. तो घाबरल्याचे दिसताच पोलिसांनी त्याच्याकडे असलेली सुटकेस उघडायला सांगितली. सुटकेस उघडल्यानंतर मात्र पोलिसांना मोठा धक्काच बसला. कारण सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह (Dead body) पोलिसांना दिसून आला. त्यानंतर त्याला त्या मृतदेहाबाबत विचारले असता, त्याने हा मृतदेह आपल्या आईचा (Mother Murder) असल्याचे सांगितले.

मृतदेह घेऊन प्रयागराजमध्ये

या प्रकरणातील युवकाचे नाव हिमांशू असून तो मूळचा बिहारमधील गोपालगंज येथील आहे. हरियाणातील हिसारमध्ये त्याने आपल्या आईची हत्या केली होती. आईची हत्या करून झाल्यानंतर त्याने तो मृतदेह सुटकेसमध्ये भरून ट्रेनने प्रयागराजला आणला. आईचा मृतदेह संगमामध्ये टाकण्यासाठी म्हणून तो प्रयागराजमध्ये घेऊन आला होता. मात्र तेवढ्यात पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

प्रयागराजचे पोलीस उपायुक्त दीपक भूकर यांनी सांगितले की, हिमांशूने आपल्या आईकडे 5 हजार रुपये मागितले होते, मात्र आईने ते देण्यास नकार दिला. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात आईचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने आईचा मृतदेह सुटकेसमध्ये घालून रेल्वेने तो प्रयागराजला पोहचला होता.

रेल्वेने हिमांशू प्रयागराजला पोहचल्यानंतर तो सुटकेस घेऊन इकडे तिकडे फिरत होता. त्यावेळी पोलिसांना त्याच्या हालचाली थोड्या संशयास्पद वाटल्या, म्हणून त्याची त्याचवेळी चौकशी केली. मात्र त्याला त्यावेळी कोणतेही उत्तर देता आले नाही. ज्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडील सुटकेसचा संशय आला, त्यावेळी त्याला सुटकेसमध्ये काय आहे असं विचारल्यावर तो थोडा गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आला.

त्यामुळे पोलिसांनीही त्याला सुटकेस उघडायला सांगितले, त्यावेळी त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने सुटकेस उघडली त्यावेळी मात्र पोलिसांनी धक्काच बसला. कारण त्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. नंतर चौकशी केली असता त्याने आपल्या आईचा गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो प्रयागराजला आला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button