रोज रात्री झोपताना उशीखाली कापूर का ठेवावा ?
आयुर्वेदिक अभ्यासक सर्दी पडसे तसेच खोकला यापासून आराम मिळविण्यासाठी कापूरचा वापर करतात. शास्त्रामध्ये कापुर आरोग्यदायी मानले जाते. कापूर जाळून त्यातून येणारा धूर श्वासावाटे घेतल्यास अनेक प्रकारच्या आजारांवर उपायकारक असल्याचे सांगितले जाते.
कापूर हे निसर्गाच्या सर्वोत्तम वेदनाशामकांपैकी एक आहे. यामध्ये असणारा अँटिस्पास्मोडिक गुणधर्म घसा, स्नायू, उबळ किंवा शरीरातील स्नायूंना होणाऱ्या वेदनांना आराम देण्यास मदत करते. आता ज्योतिषशास्त्रानुसार झोपताना उशीखाली कापूर ठेवल्यास त्याचे काही सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया हे उपाय…
ज्योतिष शास्त्रानुसार घरातील नकारात्मक उर्जा वाढल्यास अथवा कुटुंबातील वादाचे प्रमाण वाढल्यास, याशिवाय पितृदोष किंवा ग्रहांची स्थितीचा वाईट प्रभाव पडत असल्यास यासाठी ज्योतिषशास्त्रातील काही सोपे उपाय अवलंबू शकता.
वैवाहिक जीवन आनंदी होईल
नवरा बायकोच्या नात्यात वाद होत असतील तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवावा. त्यानंतर सकाळी तो कापूर जाळून टाकावा, राहिलेली राख वाहत्या पाण्यात सोडून द्यावी. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात सुख समाधान नांदेल.
मानसिक स्थिती सुधारण्यास होते मदत
एखाद्याचे मनोबल बिघडले असल्यास रात्री झोपताना उशीखाली कापराचा तुकडा ठेवावा. ज्यामुळे मनोबल सुधारण्यास मदत होईल. त्याचबरोबर व्यक्ती नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यास मदत होईल.
वाईट स्वप्ने पडणार नाहित
काहींना रात्री झोपेत वाईट स्वप्ने पडतात. त्यांनी देखील उशीखाली कापराची गोळी ठेवल्यास शांत झोप लागेल. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होईल. अशाप्रकारे कापराचा अनेक प्रकारे वापर करता येत असल्याचे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे.