सेक्स रॅकेट उघड एक पुरुष आणि 4 महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
गाझियाबादच्या राजनगर सेक्टर-7 या उच्चभ्रू भागात एका घरावर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेट उघड केलं आबे. एक पुरुष आणि 4 महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.
या सेक्स रॅकेटची संचालिका नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. गेल्या 10 महिन्यांत देहव्यापार करण्याच्या आरोपाखाली तिला तिसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.
गाझियाबादचा राजनगर सेक्टर-7 हा अतिशय पॉश भाग समजला जातो. याच भागात कविनगर पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केलाय. राजनगर सेक्टर-7 भागातल्या एका घरात सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती. मंगळवारी (12 डिसेंबर) रात्री घटनास्थळी छापा टाकण्यात आला, तेव्हा पहिल्या खोलीत 3 महिला होत्या. दुसरी खोली उघडली असता, तिथे एक महिला आणि एक पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. तसंच घराची झडती घेतली असता तिथे काही आक्षेपार्ह वस्तूही आढळल्या असं कविनगर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी या सर्व 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्या महिलांची चौकशी केली असता, पैशांसाठी देहव्यापार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या संचालिकेचाही समावेश आहे. त्या महिलांसोबत अटक करण्यात आलेला पुरुष हा त्यांचा ग्राहक असून त्याचं नाव राहुल गुप्ता असं आहे. तो रमतेराम रोड इथला रहिवासी आहे.
अटक करण्यात आलेली सेक्स रॅकेटची संचालिका नंदग्राम पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातली रहिवासी आहे. गेल्या 10 महिन्यात तिसऱ्यांदा तिला या संदर्भात अटक करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीला तिला कविनगर पोलीस ठाण्याजवळच्या एका कोठीमध्ये 2 महिला आणि 2 ग्राहकांसह अटक करण्यात आली होती. तसंच साधारण महिन्याभरापूर्वी तिला सिहानी गेट पोलिसांनी अशाच एका प्रकरणात अटक केली होती. गरीब स्त्रियांना फसवून ती असं काम करायला लावते असं पोलिसांनी सांगितलं. तसंच ग्राहकांकडून ती यासाठी 1 ते 3 हजार रुपये घेते. व्हॉट्सअॅप कॉलवरून ती डील करायची.ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून निवडीनंतर फोटो डिलीट करून टाकायची. काहीच दिवसांपूर्वी गाझियाबादमधल्या आदित्य मॉलमध्ये काही स्पा सेंटर्सवर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेट उघड केलं होतं. तिथून 44 महिला आणि 21 पुरुषांना अटक करण्यात आली होती.