मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात केलं दाखल
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. राज्यभरातील गावागावात जरांगे पाटील सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना हजारो लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
याचदरम्यान, मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी हाती आली आहे. बीडमध्ये जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जरांगे पाटील यांचा चौथा टप्प्यातील महाराष्ट्र दौरा सुरु आहे. सोमवार 11 डिसेंबर रोजी मनोज जरांगे हे बीडमधील अंबाजोगाई येथे दाखल झाले होते. सुरुवातीलाच व्यासपीठावर पोहचल्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती. त्यावेळी डॉक्टरांनी देखील तपासणी केली. त्यानंतर त्यांचे भाषण संपताच त्यांना तेथील थोरात रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची सभेदरम्यान तब्येत घालावली. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज जरांगे यांची काही वेळापूर्वी अंबाजोगाई येथील वाघाळा या ठिकाणी सभा झाली. या सभेपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी अशक्तपणा जाणवू लागला होता. पण तरीही त्यांनी सभेला संबोधित केलं. आणि सभा संपल्यांनंतर त्यांची तब्येत अधिकच खालावली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आलीये. मंगळवार 12 डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांच्या बीड जिल्ह्यात तीन सभा होणार आहेत.