फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन कोटी रुपयांची मागितली खंडणी अन तिच्यावर केला लैंगिक अत्याचार

सांगली : येथील एका डॉक्टर महिलेचा समाजमाध्यमांवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी हर्षवर्धन अंकुश कुंभार (रा.पाटण, जि. सातारा) याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
2021 मध्ये पीडितेची आणि संशयिताची समाजमाध्यमांतून ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर त्याने पीडितेकडून 50 हजार रुपये उसने घेतले. नंतर तिला फिरायला जायचे असल्याचे खोटे सांगून कोल्हापूर जिल्ह्यात एका ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने त्याच्याकडे उसने दिलेले पैसे मागितले तेव्हा संशयित हर्षवर्धन याने तिचा अश्लील फोटो तयार करून तिच्या व्हॉटस्अॅपवर टाकला. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली. पीडितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पीडिता काम
करीत असलेल्या ठिकाणी येऊन तिला मारहाण केली. धमकी देऊन तिला आपल्या मोटारीतून निर्जन ठिकाणी नेत तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले. तिच्या मुलालाही जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. त्यानंतर पीडितेने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे .