क्राईम

प्रेम प्रकरणातून तरुणांची भरदिवसा हत्या; घटनेने खळबळ


परभणी : परभणीच्या पूर्णा शहरातील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय परिसरात एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. सदर घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

जिल्ह्यातील पूर्ण शहरातील घडलेल्या या घटनेने परिसरात घाबरत पसरली आहे. घटनास्थळी मिळालेल्या पिस्टल आणि बुलेट सापडल्यामुळे मयतावर तत्पूर्वी गोळीबार केला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आकाश कदम असे घटनेतील मयताचे नाव असून प्रेम प्रकरणातून त्याचा खून झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसूधा आर यांनी दिली. पण सदर युवकाला गोळी लागली नसल्याचा दावाही पोलीस अधीक्षक यांनी केला.

पवार नावाच्या २३ वर्षीय तरुणाचे या खून प्रकरणात नाव पुढे येत आहे. घटनेमुळे एकच खळबळ माजली असून शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पुढील तपासासाठी श्वानपथक, ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button