बीड शहरातील किल्ला गेट, कागदी दरवाजा भागातील पुरातन मंदिर अतिक्रमणाच्या व विटंबनेच्या विळख्यातून मुक्त करा – मनसे
बीड शहरातील किल्ला गेट, कागदी दरवाजा भागातील पुरातन मंदिर अतिक्रमणाच्या व विटंबनेच्या विळख्यातून मुक्त करा – मनसे
बीड : (सदाशिव बिडवे कार्यकारी संपादक लोकशाही न्युज24 विषेश )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
शासकीय विश्राम ग्रह बीड येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली
बीड शहर हे ऐतीहासिक शहर असून या शहरात अनेक मंदिरे पुरातन वास्तु असुन शहराचे वैभव वाढवण्या बरोबरच सांस्कृतीक वारसा जोपसण्याचे काम या अनेक वास्तु मधुन होत आहे. परंतु शहरातील किल्ला गेट, मिल्लीया आर्टस सायन्स कॉलेजच्या बाजुला पुरातन मंदिर असून जुन्या जाणकार व वयोवृध्द लोकांकडुन माहिती मिळते की, हे मंदिर श्री महालक्ष्मी मंदिर असून आज ही हे मंदिर सुस्थीत आहे. परंतु आजुबाजुच्या रहिवाशी लोकांनी या मंदिरात ड्रेनेजचे, नालीचे पाणी सोडुन व कचरा टाकुन या मंदिराची विटंबना करण्या बरोबरच हे मंदिर बुजून टाकण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. हे मंदिर हेमांडपंथी शिल्पकलेचा नमुना असून अनेक खांबांनी सुसज्य असे हे मंदिर आहे. परंतु पुर्ण पणे मुस्लीम समाज बहुल भागात असल्याने या मंदिराकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्या भागातील रहिवाश्याकडुन हे मंदिर बुजवून नष्ट करण्याचा प्रयत्न जाणीव पुर्वक होत आहे.
आवक, मेहसूल सहायक जिल्हाधिकारी महोदयांना नम्र विनंती की, संबंधीत यंत्रणाना आदेशीत करून हे मंदिर 50/ जिल्हाधिकारी दृष्ट चक्रातून व अतिक्रमणातुन मुक्त करावे. हे मंदिर मुक्त करण्या कामी महराष्ट्र नवनिर्माण सेनेला समाजाचे व पक्षाचे आंदोलन उभे करण्यास प्रशासनाने प्रवृत्त करु नये अशी मागनी
अशोक तावरे राज्यउपाध्यक्ष,श्रीराम बादाडे जिल्हाध्यक्ष,सदाशिव बिडवे जिल्हाउपाध्यक्ष मनसे यांच्या सह प्रमोद मीटे,रेखाताई ,
स्मिता तिडके
कल्पनाताई कवटेकर
अशोक सुरवसे श्रीकृष्ण गायके
करण लोंढे
तुषार दोडके
आकाश टाकळकर
आदर्श तरकसे
कार्तिक जव्हेरी
अनिल जमदाडे बन्सी गुंदेकर
बालाजी काटे यांनी या निवेदना द्वरे केली आहे व सदरील आशयाचे निवेदन पत्र जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले आहे.