सीबीआयकडून रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा दाखल,409 कोटींचा घोटाळा
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आमदार आणि उद्योजक आणि आमदार रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड यांच्या विरोधात 409.26 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.
आमदार गुट्टे यांच्यासाहित त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधातही सीबीआयने कारवाई केली आहे. गुट्टे हे गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालकापैकी एक आहे.
रत्नाकर गुट्टे त्यांच्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडने 2008 ते 2015 या कालावधीत युको बँकेच्या मुदत कर्ज आणि इतर पत सुविधांच्या रूपात 577.16 कोटी रुपयांच्या विविध क्रेडिट सुविधा कर्जाच्या स्वरूपात घेतल होतं. प्रकरण समोर आल्या नंतऱ सीबीआयने ४०९ कोटी रुपयांच्या बँक (Bank) फसवणुकीप्रकरणी गुट्टे आणि कुटुंबाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयने (CBI)गुट्टे यांच्याशी संबंधित पाच ठिकाणी छापे टाकले होते. नागपुरातील २ आणि परभणीत तीन ठिकाणी छापे टाकले होते.
ईडीने गेल्या वर्षीच मनी लाँड्रिंगप्रकरणी डिसेंबरमध्ये रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड यांच्याविरुद्ध कथित आरोपपत्र दाखल केले होते. गुट्टे यांच्या कंपनीने कथित बँकाची कर्जे ज्यासाठी मंजूर करण्यात आली होती त्यापेक्षा दुसऱ्या कारणांसाठी वापरल्याचा आरोप आहे.