क्राईम

विना तिकीट प्रवास करणा-या मुलीला थांबवले.. मुलीने टीसीचे नाक फोडून केली बेदम मारहाण


रेल्वेत टीसी म्हणून कार्यरत असलेल्या आणि सध्या मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर तैनात असलेल्या राहुल शर्माने विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका मुलीला थांबवण्याचे धाडस केले.

त्यानंतर त्या मुलीने आणि तिच्या साथीदारांनी टीसीला बेदम मारहाण केली. बोरिवली स्थानकावर ही घटना घडली आहे.

 

fविशेष म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या जीआरपीला मुलीवर कोणतीही कारवाई करता आली नाही. त्यामुळे The NCM India Council for Men Affairs या ग्रुपच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या घटनेची माहिती देणारी पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यात रेल्वे आपल्याच अधिकाऱ्यांचे रक्षण करू शकत नाही, मग सर्वसामान्य प्रवाशांचे संरक्षण कसे करणार? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे.

रेल्वेत विनातिकीट प्रवास करणारे नेहमीच भेटत असतात. त्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. पण, कोणीही असे बेदम मारहाण पर्यंत जात नाही. पण, अलीकडे अशी मारहाण होत असल्यामुळे सरकारी कर्मचा-यांमध्ये भीती असते. ती भीतीच या घटनेत खरी ठरली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button