पतीला सोडून दुसऱ्यासोबत रहायला गेली पत्नी , संतापाच्या भरात त्याने…..
गाझियाबाद : शहरातील चिरंजीव विहार येथील एका महिलेच्या हादरवणाऱ्या हत्याकाडांचा अखेर उलगडा झाला आहे. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून मारेकरी दुसरा-तिसरा कोणी नसून त्या महिलेचा जावईच होता.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र हत्या करण्याचे जे कारण त्याने सांगितलं, ते ऐकून पोलिसही हादरले. आरोपीची बायको त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत रहात होती. आरोपीच्या पत्नीने जाताना त्याला दागिनेही परत केली नाहीत. यासाठी सासूलाच जबाबादर ठरवून त्याने तिला संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पैशांसाठी सासूनेच बायकोचा केला सौदा, संशयातून घडला मोठा अनर्थ
गुरुवारी गाझियाबादमधील चिरंजीव विहार सेक्टर-९ येथील घरात कुसुम या ५० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे दिसत होते. मारेकऱ्यांनी तिच्या गळ्यावरील वळ झाकण्यासाठी तिच्या अंगावर शाल टाकली आणि पोबारा केला. आईची हत्या झाल्याचे कळताच तिच्या मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने पोलिसांत धाव घेऊन आपली बहीण, तसेच तिचा नवरा आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अखेर बऱ्याच तपासानंतर पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली.
सासूने पैशाच्या लोभापोटी पत्नीला विकल्याचा संशय आरोपी जावयाला होता. गुरुवारी आरोपी त्याच्या एका साथीदारासह त्याची सासू कुसुम हिला भेटायला आणि चर्चा करायला गेला होचा. मात्र त्यांच्यात भांडण सुरू झाले , ते इतके विकोपाला गेले की संतापलेल्या जावयाने त्याच्या सासूचा गळाच आवळला आणि तिची हत्या केली. आजूबाजूच्या सीसीटीव्हीमुळे आरोपी मृत महिलेच्या घरी गेल्याचे स्पष्ट झाले होते. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी त्याच आणखी एक साथीदार अद्याप फरार असून पोलिस त्याचाही कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले, ज्यामध्ये महिलेचा जावई दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसत होता. यानंतर पोलिसांनी आरोपी जावयाला चौकशीसाठी कविनगर पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेतले. फुटेज पाहून आरोपीच्या पत्नीनेही त्याला ओळखले.
दरम्यान ज्या महिलेची हत्या झाली , तिच्या आपल्या बहिणीवरही हत्येचा आरोप केला होता. मात्र त्या महिलेची मुलगी आणि ती ज्या व्यक्तीसोबत रहात होती, त्या दोघांचाही हत्याकांडात सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासाता पोलिसांना आढळले.
पतीला सोडून दुसऱ्यासोबत रहायला गेली पत्नी , संतापाच्या भरात त्याने
मृत महिलेची मुलगी आणि आरोपीचे 2009 साली लग्न झाले. त्या दोघांना दोन मुलं आणि एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. सगळं काही आलबेल होतं. पण लग्नाच्या 14 वर्षांनंतर आरोपीच्या पत्नीने त्याचं घर सोडलं आणि ती शेजारच्या तरूणाोबत राहू लागली. आरोपीने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या पत्नीने त्याचं काहीच ऐकलं नाही. एवढेच नव्हे तर घरातून जाताना तिने लग्नात (सासरकडून) मिळालेले सर्व दागिनेही ती सोबत घेऊन गेली.
बायकोच्या या वागण्यामुळे हैराण झालेल्या आरोपीने त्याच्या सासूकडे धाव घेतली आणि तुमच्या मुलीला समजवा, तिला परत यायला सांगा अशी विनंती केली. मात्र त्याच्या सासूने मुलीला समजावण्याचे फारसे काही प्रयत्न केले नाहीत. त्यातच त्याची बायको दागिने द्यायलाही तयार नव्हती. त्यामुळे पैसे, आणि दागिन्यांच्या लोभापायी सासूनेच आपल्या बायकोचा सौदा केला असावा, असा संशय आरोपीला आला.
चर्चा करण्यासाठी सासूच्या घरी गेला पण…
याचा राग आल्याने आरोपी गुरुवारी सासूशी बोलण्यासाठी आला. दहा वाजल्यानंतर घरी सासूशिवाय कोणी सापडणार नाही हेही त्याला माहीत होतं. घरी गेल्यावर त्यांच्यात चर्चा झाली. पण सासूने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पत्नी किंवा दागिने परत करण्याबाबत कोणतेही ठोस उत्तर दिलं नाही. याचाच आरोपीला प्रचंड राग आला आणि त्याच रागाच्या भरात त्याने सासूचा गळा दाबून खून केला. तेव्हा त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. हत्येच्या घटनेनंतर तो अद्यापही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.