शहजाद आणि कोमलची प्रेमकहाणी,शहजाद जेव्हा कोमलसोबत राहत नाही, तेव्हा त्याला निद्रानाशाचा विकार जडतो.
प्रेम कुठेही, कधीही, कोणाशीही होऊ शकतं. वय, रंग-रूप, गरिबी-श्रीमंती या कशाचंही बंधन प्रेमात नसतं. अशा किती तरी प्रेमकहाण्या आपण ऐकतो-वाचतो-पाहतो. प्रेमकहाण्यांवरच्या कादंबऱ्या, चित्रपट तर लोकप्रिय ठरतात.
असेच व्रत्त एका मराठी वेबसाईडने प्रसारित केले आहे
काही प्रेमकथा मात्र खूप आश्चर्यकारक असतात. प्रत्यक्ष जीवनातल्या या प्रेमकथा काल्पनिक कादंबरीपेक्षाही थक्क करून टाकतात.
सध्या पाकिस्तानातल्या एका कपलची प्रेमकहाणी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ती प्रेमकथा अशीच थक्क करणारी आहे. त्या प्रेमकथेचा नायक 18 वर्षांचा असून, नायिका 35 वर्षांची आहे. 18 वर्षांच्या या तरुणाने 35 वर्षांच्या तरुणीशी लग्न केलं आहे. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट! सहसा दाम्पत्यांमध्ये पुरुष वयाने मोठा असतो आणि स्त्री लहान. अलीकडच्या काळात वयातलं हे अंतर खूप कमी असतं आणि अनेक जोडप्यांमध्ये स्त्रीचं वय पुरुषांपेक्षाही जास्त असतं. त्यामुळे आता त्याचं कोणाला काही नवल वाटण्याचे दिवस राहिले नाहीत; मात्र या कथेतल्या तरुणाचं वय पत्नीपेक्षा जवळपास निम्मं आहे. या प्रेमविवाहाबद्दल म्हणूनच सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
या 18 वर्षीय तरुणाचं नाव शहजाद असं असून, मुलीचं नाव कोमल असं आहे. ती त्याची लांबची नातेवाईक आहे. त्यांची प्रेमकहाणी आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहजाद शाळेत शिकत होता, तेव्हाच त्याचं कोमलवर प्रेम बसलं होतं. घरच्यांनी साहजिकच खूप विरोध केला. त्या तरुणाला त्यासाठी मारही खावा लागला; मात्र प्रेम हे प्रेम असतं. वयात फरक असूनही त्यांना लग्न करायचं होतं. अखेर त्यांना परवानगी मिळाली.
या कपलच्या प्रेमकहाणीतली एक गोष्ट खूप चर्चेत आहे. ती म्हणजे शहजाद जेव्हा कोमलसोबत राहत नाही, तेव्हा त्याला निद्रानाशाचा विकार जडतो. त्याला झोपच येत नाही. ती दोघंही एकमेकांना प्रेमाच्या खास, वेगळ्या नावांनी संबोधतात. शहजाद कोमलला पिंकी या नावाने हाक मारतो, तर कोमल शहजादला मिठ्ठू असं म्हणते.