जगातील सर्वात महाग घर ‘मार्बल पॅलेस’ किंमत १६५६ कोटी रुपये,सात लाख सोन्याची पाने
जगातल्या सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुबईतील आलिशान महलाचा समावेश झाला आहे. दुबईतील अमिरात हिल्स येथे उभ्या असलेल्या या महालाला ‘मार्बल पॅलेस’ असे नाव देण्यात आले आहे.
याची किंमत १६५६ कोटी रुपये आहे.
दुबईच्या लक्सहॅबीटट सोथबाय या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थावर जंगम मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीने हे स्वप्नवत घर बांधले आहे. पांढऱ्या संगमरवरात बांधलेल्या या घरासाठी सात लाख सोन्याची पाने लावली आहेत.
या घराची संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी १२ वर्षे अगोदर त्याचे काम सुरू झाले होते. ठिकठिकाणचे राजवाडे पाहिल्यानंतर या घराची आखणी करण्यात आली. घरातली कोरीव कामासाठी ७० निष्णात कारागिरी नऊ महिने काम करत होते.
महालाचे काच काम फ्रान्सच्या १७ तज्ज्ञांनी मिळून केले. घराला दोन जिने असून मत्स्यालय, पूल रूम, स्टीम रूम, सोन रूम आहेत. २४ कॅरेट सोन्यात बांधलेला बाथटब हे यातले प्रमुख आकर्षण. घरातले कार्यालय, व्यायामशाळांसोबत ३,८०० चौरस फुटांचा बेडरूम आहे. १६ कार मावतील एवढी पार्किंग व्यवस्था महालाच्या आवारात आहे.