ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
साउथ चित्रपटसृष्टीतून दु:खद बातमी समोर आली आहे. तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, चंद्र मोहन यांना हृदयविकाराच्या आजारामुळे हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी सकाळी 9:45 वाजता अखेरचा श्वास घेतला.
चंद्र मोहन यांच्या निधनाची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि स्टार्स त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी जालंधर आणि दोन मुली असा परिवार आहे.
Veteran Telugu actor Chandra Mohan passed away due to cardiac arrest at Hyderabad's Apollo Hospital today.
— ANI (@ANI) November 11, 2023
चंद्र मोहन यांचे अंतिम दर्शन आणि अंत्यसंस्कार विधी सोमवारी हैदराबादमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्र मोहन यांनी 1966 मध्ये आलेल्या रंगुला रत्नम या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पाधारीला वायासू, चंदामामा रावे, अथनोक्कडे, 7जी वृंदावन कॉलनी, मिस्टर अशा अनेक चित्रपटांमधील अभिनयासाठी ते लोकप्रिय होते.