क्राईम
बीड १३ वर्षाचा मुलासोबत ११ वर्षांच्या मुलीचा लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार
बीड जिल्ह्यात बालविवाह उघडकीस आला आहे. ही घटना आष्टी तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे मुलीच्या आईनेच लग्न लावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी आष्टी पोलीस विभागाने चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
बीड जिल्ह्यातील बालविवाहाचे वास्तव चिंता व्यक्त करायला लावणारे आहे. बालविवाह रोखण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. मात्र, कायद्याला झुगारून बालविवाह लावून देत असल्याच्या घटना समोर येत आहे. एका ११ वर्षांच्या मुलीचा आणि १३ वर्षांच्या मुलाचा बालविवाह सोलापूर जिल्ह्यातील देवळाली येथे लावून देण्यात आला आहे. या विवाहाच्या घटनेची माहिती आष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे.
याप्रकरणी शासकीय कर्मचा-याच्या तक्रारीनंतर चाैघांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.