दोन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आपल्या पत्नीचा मेसेज,मेसेजच नाही आला, तर या व्यक्तीनं आपल्या मृत पत्नीशी संवादही साधल्याचं ..
डेटिंग अॅपवर (Dating App) कधी कोणी भूताशी बोलल्याचं तुम्ही ऐकलंय का? तुमचं माहिती नाही, पण यूकेमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं डेटिंग अॅपवर भूताशी बोलल्याचा अनोखा दावा केला आहे.
यूकेमध्ये राहणाऱ्या एक व्यक्तीनं आपलं टिंडर अकाउंट (Tinder Account) सुरू केलं. त्यानंतर त्याला टिंडरवर दोन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आपल्या पत्नीचा मेसेज आल्याचा दावा त्यानं केला आहे. फक्त मेसेजच नाही आला, तर या व्यक्तीनं आपल्या मृत पत्नीशी संवादही साधल्याचं म्हटलंय आहे. जेव्हा त्यानं घोस्ट Ghost Hans Podcast वर ही कथा शेअर केली, तेव्हा ती टिकटॉकवरही व्हायरल झाली. तो म्हणतो की, या प्रकरणामुळे अनेक महिने त्रस्त झाल्यानंतर मी हे लोकांसमोर उघड करण्याचा निर्णय घेतला.
टिंडरवर भेटली मृत पत्नी
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, डेरेक नावाची ही व्यक्ती ब्रिटनच्या लंडनमध्ये राहते. पॉडकास्टमझ्ये त्यानं केलेल्या खळबळजनक खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यानं असा दावा केलाय की, त्या पत्नी एलिसनचं निधन दोन वर्षांपूर्वी झालंय. ती गर्भाशयाच्या कर्करोगानं त्रस्त होती. पण एक दिवस टिंडरवर तिची प्रोफाईल पाहुन मी थक्क झालो. एका फोटोत तर ती माझ्याकडे पाहून हसत होती. मी लगेच तिचं प्रोफाईल पाहिलं, पण त्यात दुसरी कोणतीही माहिती नव्हती. पण माझ्या पत्नीचे असे तीन फोटो होते, जे मी यापूर्वी कधीच पाहिलेले नव्हते. हे सर्व पाहुन मला खरंच खूप धक्का बसला.
“घरी आहेस का? मी बाहेर उभी आहे”
डेरेकनं पुढे सांगताना म्हटलंय की, “मला पत्नीचं अकाउंट दिसताच, मी कसलाही विचार न करता राइट स्वाइप केलं. मी जवळपास दोन मिनिटांपर्यंत माझा श्वास रोखला. मी पुढचे दोन दिवस तर झोपूच शकलेलो नाही. मला यापूर्वी कधीच टिंडरवर कोणताही मॅच मिळालेला नव्हता.” डेरेक म्हणाला की, सुरुवातीला मला संशय आला, आधी वाटलं ही कोणीतरी मुद्दाम करतंय. कदाचित कोणीतरी माझ्या पत्नीचं खोटं अकाउंट तयार केलेलं असेल. पण खऱ्या अर्थानं माझा संशय तेव्हा दूर झाला, जेव्हा सकाळी 3.33 वाजता डिंटरवर एक मेसेज आला “HEY”. डेरेकनं उत्तर देताना विचारलं की, हे सर्व काय आहे? आणि माझ्या पत्नीचे फोटो तुझ्याकडे कसे आले? त्यावर पुढच्या 24 तासांत कोणताच रिप्लाय आला नाही. त्यानंतर एक मेसेज आला, “घरी आहेस का? मी बाहेर उभी आहे, मला घरात येऊ देत.” हा मेसेज वाचून माझ्या अंगावर काटाच आला.
“तू टिंडरवर खूप लवकर आलास, डेरी”
डेरेकनं सांगितलं की, “त्यानंतर मी घराच्या मुख्य दरवाजा उघडून बंद होण्याचा आवाज ऐकला आणि मी खूप घाबरलो. अंगावर सर्रकन काटा आला. मी घाबरुन थेट माझ्या बेडवर जाऊन झोपलो. तेवढ्यात टिंडरवर मला एक मेसेज आला. “तू टिंडरवर खूपच लवकर आलास, डेरी” तो मेसेज पाहून मी खूपच ऐराण झालो. कारण फक्त माझी पत्नीच मला डेरी नावानं हाक मारायची. इतर कोणाला याबाबत माहितीही नव्हती.
“एलिसन, मला माफ कर”
थोड्या वेळानं मला माझ्या बेडरुममध्ये कोणीतरी आल्याचा आभास झाला. मी एवढा घाबरलेलो ती, शेवटी मी मेसेज केला, “एलिसन, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला नेहमी तुझी आठवण येत असते. दोन वर्ष झालीत आणि आता मला माझ्या आयुष्यात पुढे जायचंय.” त्यानंतर डेरेक बेडरुममधून उठून मुख्य दरवाजात आला आणि त्यानं पाहिलं. त्यावेळी तिथे कोणीच नव्हतं आणि पुन्हा बेडरुममध्ये येऊन त्यानं टिंडर अॅप चेक केलं. त्याची पत्नी एलिसनची प्रोफाईलही नव्हती. डेरेक सांगतो की, मला आजतागायत कळालेलं नाही, हे सर्व माझ्यासोबत कसं झालं आणि का?