वॉशिंग मशिनमध्ये तब्बल सव्वा कोटी,६ वॉशिंग मिशन्स व ३० मोबाईल फोन ..
आंध्र प्रदेशमध्ये एका ट्रकमधून काही घरगुती सामनाची वाहतूक करण्यात येत होती. त्यामध्ये, वॉशिंग मशिनचाही समावेश होता. या वाहतूक प्रवासाबद्दल पोलिसांना खबऱ्याकडून टीम मिळाली होती. त्यानुसार, या ट्रकमधून मोठी रक्कम चोरून नेली जात असल्याचं पोलिसांना समजलं.
त्यामुळे, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ट्रकला थाबवले. यावेळी, ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये ठेवण्यात आलेल्या वॉशिंग मशिनमध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांची रोकड आढळून आली.
पोलिसांना वॉशिंग मशिनमध्ये १ कोटी ३० लाख रुपयांची रोकड आणि काही सेलफोन सापडले. पोलिसांनी ही रक्कम आणि फोन ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांना दिसून आलेला ट्रक हा मिनी कार्गो होता, तो वीज उपकरणाच्या शोरुमकडे चालला होता. त्या दरम्यान पोलिसांनी ट्रक पकडला.
विजयवाडा जात असलेल्या मिनी कार्गो ट्रकमधून सव्वा कोटी रुपयांची रोकड आणि ६ वॉशिंग मिशन्स व ३० मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी, कुरिअर सर्व्हीसचं काम करणाऱ्या तिघांना अटकही करण्यात आली आहे. कंपनीकडून ही रक्कम विशाखपट्टण आणि आजुबाजूच्या श्रीकाकुलम व विजयनगरम येथील बँकेत जमा करण्यासाठी पाठवली जात होती, अशी माहिती गजुवाकाचे डीसीपी के. आनंद रेड्डी यांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असता, नेमकी रोकड लपून छपून का नेली जात होती, याबाबत कुणालाही स्पष्ट उत्तर देता आले नाही. तसेच, यासंदर्भातील कुठलेही कागदपत्रे किंवा आर्थिक व्यवहाराची पावतीही आढळून आली नाही. त्यामुळे, पोलिसांनी आयपीसी १०२ आणि ४१ अंतर्गत गुन्हा दाखल केला.