मुंबईवर घोंगावतंय ‘तेज’ चक्रीवादळाचे संकट, कधी धडकणार?
अरबी समुद्रात येत्या २१ ऑक्टोबर रोजी ‘तेज’ हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या चक्रिवादळाचा परिणाम मुंबईत देखील जाणवण्याची शक्यता असून या पार्श्वभूमिवर भारतीय हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंजादानुसार याच्या संभाव्य पश्चिम-वायव्य मार्गामुळे मुंबईतील रहिवासी आणि प्रशासनाला सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्रातील या हवेच्या दबावामुळे मुंबई शहरात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात वेगाने वारे आणि मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे.
अग्नेय अरबी समुद्र आणि त्याच्या शेजारच्या लक्षद्वीप परिसरात चक्रीवादळाचा सतत प्रभाव दिसून येत आहे. समुद्रसमाटीपासून ३.१ किमी उंचीपर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे.
या चक्रीवादळाच्या सर्कुलेशनच्या प्रभावामुळे येत्या ३६ तासांमध्ये पूर्व-मध्य तसेच लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ऑक्टोबरपर्यंत मध्य अरबी समुद्रावर हवेचा दबाव अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरिन क्षेत्रात कमी ते मध्यम स्वरूपाचे विखुरलेल्या स्वरूपातील ढग तयार होत आहेत.
चक्रीवादळ तेज
पाण्याचे वाढलेले तापमान यामुळे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ विकसीत होण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा सर्वोत्तम काळ असते. तसेच २०२२ नंतरच्या मॉन्सून हंगामात अरबी समुद्रावर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निर्माण झाले नाहीत, याउलट सित्रांग आणि मंडौस या दोन उष्णकटिबंधीय वादळांनी बंगालच्या उपसागरात धडक दिली होता. त्यामुळेच अरबी समुद्रात हे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वाढते असा दावा करण्यात आला आहे.
हिंदी मगासागर क्षेत्रातील चक्रीवादळांना नाव देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पध्दतीनुसार जर भारतीय समुद्रात उष्णकटिबंधीय वादळ निर्माण झाले, तर त्याला तेज असे नाव दिले जाईल. मात्र स्कायमेट वेदरनुसार अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा मार्ग आणि वेळ ही अनिश्चित असू शकते.