व्हिडिओ न्युज

Video:वेफर्सचं पॅकेट चोरलं म्हणून पोलिसांनी मुलाला पकडून नेलं..


लहान मुलं ही छोट्या-मोठ्या गोष्टींची चोरी करतात, एक तर त्या गोष्टी अभ्यासाशी संबंधित असतात किंवा खेळण्याच्या किंवा खाण्याच्या.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) याच्याशीच संबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यात पोलीस एका लहान मुलाला चोरीच्या आरोपाखाली पकडून घेऊन जाताना दिसत आहेत. पकडल्यावर हा लहान मुलगा जोरजोरात रडायला लागतो, पण तरीही पोलीस त्याला पकडून घेऊन जातात.

नेमकं घडलं काय?

पोलीस ज्या लहान मुलाला पकडून घेऊन जात आहेत, त्याच्यावर एका दुकानातून वेफर्सचं पॅकेट चोरल्याचा आरोप आहे. न्यूयॉर्कमधील (New York) सिराक्यूजमध्ये ही घटना घडली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, पोलीस कर्मचारी मुलाला पकडून त्यांच्या गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत आहे. हा मुलगा जोरजोरात रडत आहे. पोलीस मुलाला घेऊन जात असताना केनेथ जॅक्सन नावाच्या व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर व्हायरल केला.

लहान मुलाला अटक करण्यास केला विरोध

ज्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवला, तो पोलीस कर्मचाऱ्याशी बोलत असल्याचंही ऐकू येतं. व्हिडिओमध्ये केनेथ जॅक्सन म्हणतो, “तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही मुलाला ताब्यात का घेत आहात?” ज्याच्या प्रत्युत्तरात दुसरा पोलीस म्हणतो, हा मुलगा दुकानातील वस्तू चोरत होता.

यानंतर केनेथ पोलिसांना अडवतो आणि म्हणतो, “नाही, तो फक्त चिप्सचं पॅकेट चोरत होता. तुम्ही त्याच्याशी क्रूरपणे आणि एखाद्या खुन्याप्रमाणे वागता आहात.” या 4 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये केनेथ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांना त्यांच्या नावानेच हाक मारायला लागल्यावर प्रकरण अधिकच चिघळत असल्याचं दिसून येतं.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

 

केनेथ जॅक्सनने म्हटलं की, व्हिडीओत दिसणारा लहान मुलगा खूप घाबरलेला होता आणि त्यामुळे त्याने पोलीस अधिकाऱ्यांना असं करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने म्हटलं की, लहान मुलांशी बोलण्याची एक पद्धत असते, ज्याचं पोलिसांनी पालन केलं नाही. पोलिसांचं वागणं अत्यंत क्रूर होतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button