अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप, आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू..
अफगाणिस्तानातील लोकांना एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यामध्ये आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील भूकंप हा सीरिया आणि तुर्कस्तानमधील भूकंपापेक्षा भयंकर आहे
BREAKING: A powerful 6.3 magnitude earthquake has struck western Afghanistan, the US Geological Survey said, more than a week after strong quakes and aftershocks killed thousands of people and flattened entire villages. https://t.co/6mstNBATXY
— The Associated Press (@AP) October 15, 2023
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा जमीन हादरली. हेरात शहरामध्ये मध्यरात्री भूकंप झाला आहे. मध्यरात्री 3.36 वाजता वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. हेरातपासून 33 किलोमीटर 20 मैल अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
रविवारी पश्चिम अफगाणिस्तानमध्ये 6.3 इतक्या तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे.
Notable quake, preliminary info: M 6.3 – western Afghanistan https://t.co/v6tjRGPe7s
— USGS Earthquakes (@USGS_Quakes) October 15, 2023
अफगाणिस्तानमधील भूकंपाचं सत्र सुरुच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या भूकंपामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर वित्त हानी देखील झाली आहे.
भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोक घरातून आणि ऑफीसमधून बाहेर आले. प्रत्यक्षात गेल्या आठवडाभरात भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.