इस्राइलच्या युद्धभूमीतून २१२ भारतीय परतले मायदेशी!
युद्धग्रस्त इस्त्राइलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत २१२ भारतीय परत आले आहेत. आज सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले.
इस्त्राइल आणि हमास यांंच्यात गेल्या शनिवारपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत अडीच हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धामुळे इस्त्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून बचाव मोहीम हाती घेतली जात असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. या मोहिमेचे नाव ऑपरेशन अजय असे ठेवण्यात आले आहे.
#OperationAjay: First flight carrying 212 Indian nationals from Israel, lands at Delhi airport pic.twitter.com/tKrV0WV4X9
— ANI (@ANI) October 13, 2023
त्यानुसार पहिल्या टप्प्यात २१२ भारतीय आपल्या मायदेशी आले आहेत. आज सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले.बेन गुरियन विमानतळावरून भारतीयांना घेऊन एका खासगी विमानाने भारताच्या दिशेने रात्री नऊ वाजता उड्डाण केले. ज्या भारतीयांना मायदेशी परतायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही सेवा भारत सरकारने उपलब्ध करून दिली होती.