पुणे विभागातील कर्तबगार अधिकाऱ्यांमुळे पुणे विभागाची एस.टी.2019 ची सरळ सेवा भरती अखेर मार्गे लागली.
पुणे विभागातील कर्तबगार अधिकाऱ्यांमुळे पुणे विभागाची एस.टी.2019 ची सरळ सेवा भरती अखेर मार्गे लागली.
महाराष्ट्र सरकारने 2019 मध्ये दुष्काळग्रस्त भागातील मुलांना न्याय देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळामध्ये सरळ सेवा पद्धतीने 12 विभागामध्ये 4416 जागांची चालक तथा वाहक पदाची जाहिरात काढली होती.त्यामध्ये 11 विभागांमध्ये भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली होती व फक्त पुणे विभागामध्ये मागील 4 वर्षापासून ही भरती प्रक्रिया थांबलेली होती.ती आता पूर्ण झालेली आहे व 3 ऑक्टोबर 2023 पासून 1124 मुलांना मेडिकल साठी बोलवण्यात आले आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की 2019 मध्ये एस.टी.महामंडळाने 12 विभागांसाठी 4416 जागांची चालक तथा वाहक पदाची जाहिरात काढली होती.व त्यातील 11 विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती.पुणे विभागामध्ये जानेवारी 2019 मध्ये 1647 जागांची चालक तथा वाहक पदासाठी जाहिरात आली होती.यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी 7148 उमेदवारांनी परीक्षा दिली होती,मग शारीरिक चाचणी व त्यानंतर त्यांची कागदपत्र छाननी करण्यात आली,व त्यानंतर त्यांचे मेडिकल करण्यात आले.या मधून 2982 मुलांना 17 जाने.2020 पासून भोसरी येथील वाहन चालन प्रशिक्षण केंद्रात ट्रायल टेस्ट साठी बोलाविण्यात आले होते.त्यामधून 2240 मुलांची ट्रायल झाल्यावर 25 फेब्रुवारी 2020 ला तो ट्रॅक बंद पडला.त्यानंतर कोरोनाचा काळ,मग लॉकडाऊन, त्यानंतर राज्य शासनाने या भरतीवर स्थगिती आणली होती.त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 4 ऑक्टोबर 2022 रोजी या भरतीवरील स्थगिती उठवली व ही भरती ज्या टप्प्यावर थांबली होती तेथून सुरू करण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले.त्यानंतर एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक आजीत गायकवाड साहेब यांनी सर्व विभागांना भरती सुरू करण्याचे आदेश दिले.व त्यानुसार सर्व विभागांनी ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली होती तेथून परत सुरू केली.पण पुणे विभागाची पूर्ण भरती प्रक्रिया ही थांबलेली होती कारण अजून 742 मुलांच्या ट्रायल राहिल्या मुळे त्यांची अंतिम निवड यादी जाहिर करता येत न्हवती.पुणे विभागात चालक तथा वाहकांच्या अनेक जागा रिक्त होत्या पण त्यांच्या ट्रायल न झाल्यामुळे त्यांच्या अंतिम निवड यादी जाहीर ही करता येत नव्हत्या.त्यामध्ये मुलांचे वय निघून जात होते.त्यांचे लग्न थांबलेले होते.अशात पुणे विभागातील मुलांनी 20 फेब्रुवारी 2023 व 15 मे 2023 ला आझाद मैदान मुंबई येथे व 21 जून 2023 ला विभागीय कार्यालय पुणे येथे आंदोलने सुद्धा केली होती.त्यानंतर पुणे विभागीय नियंत्रक म्हणून श्री कपिल पाटील साहेब यांनी पदभार घेतला व या भरतीला वेग आला असे म्हणायला हरकत नाही.त्यांनी तात्काळ 5 जुलै 2023 पासून राहिलेल्या मुलांच्या ट्रायल घेण्याचे परिपत्रक काढले.10 ऑगस्ट 2023 रोजी सर्व मुलांच्या वाहन चाचण्या संपल्या व 2 सप्टेंबर 2023 रोजी पुणे विभागातील पात्र मुलांच्या अंतिम निवड याद्या जाहीर करण्यात आल्या.आता 25 व 27 सप्टेंबर 2023 रोजी सर्व मुलांचे मेडिकल घेण्याचे परिपत्रक काढले आहे.व त्यानंतर मेडिकल मध्ये पात्र होणाऱ्या मुलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.या मध्ये ही भरती प्रक्रिया पुणे विभागाने पूर्णपणे निष्पक्षपणे मुलांच्या सर्व बाजूंचा विचार करून,आणि उमेदवार सोबत अन्याय होणार नाही,अतिशय शांत पद्धतीने सर्व बाबींचा विचार करून ही भरती प्रक्रिया मार्गी लावलेली आहे.यामध्ये पुणे विभागीय नियंत्रक कपिल पाटील साहेब,DTO भगत साहेब,वरिष्ठ लिपिक महादेव थोरात साहेब व पुणे भागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन ही भरती प्रक्रिया मार्गी लावलेली आहे.व मुलांना न्याय दिला आहे त्याबद्दल पुणे विभागातील सर्व अधिकारी तथा सर्व कर्मचारी व या भरतीसाठी ज्यांनी ज्यांनी ज्या प्रकारे सहभाग नोंदवाला त्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन.