बुर्खा, हिजाब, तीन तलाक, हलाला आणि बहु विवाह या कुप्रथा – शिवानी
लखनऊ : “मुस्लिम धर्मात महिलांना मुलं जन्माला घालण्याची मशीन समजलं जातं. माझ्या आईचा सुद्धा मुलं जन्माला घालताना मृत्यू झाला. हिंदू धर्मात खुल्या हवेत श्वास घेण्यात स्वातंत्र्य आहे.
मी शिव भक्त आहे” शबानाची शिवानी झालेल्या मुलीचे हे उद्गार आहेत. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये रहाणाऱ्या शबानाने आपल्या हिंदू प्रियकरासोबत लग्न केलं. शबाना आता शिवानी झाली आहे. शिवानीला हिंदू धर्माच आचरण करायला आवडतं. शिवानी बुर्खा, हिजाब, तीन तलाक, हलाला आणि बहु विवाह या कुप्रथा असल्याच सांगितलं. बरेलीत शिवानीने मंगळवारी हिंदू धर्मात प्रवेश केला. फरीदपूर येथे राहणारी 21 वर्षाची शबाना आता शिवानी बनलीय. तिने अरविंद सोबत हिंदू पद्धतीने विवाह केला. मढ़ीनाथ येथील अगस्त मुनि आश्रमात आचार्य पंडितच्या शंखधारने गोमूत्र आणि गंगाजलने शबानाचा शुद्धिकरण केलं. त्यानंतर मंत्रोच्चारात शिवानीने अरविंद सोबत लग्न केलं.
फरीदपूरच्या भगवंतापूरमध्ये राहणाऱ्या शबानाच शेजारच्या केरुआ गावात राहणाऱ्या अरविंद बरोबर सूत जुळलं. शबाना भगवान शंकराची पूजा करते. शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करते. इतकच नाही, ती ओम नमः शिवाय जपही करते. शिवशंकरावर तिची प्रचंड श्रद्धा आहे. शबाना आता शिवानी बनलीय. इस्लाममध्ये महिलांना मुलं जन्माला घालण्याची मशीन समजलं जातं. तिच्या आईचा सुद्धा मुलं जन्माला घालताना मृत्यू झाला. शबानाला 8 भाऊ आहेत. ती त्यांच्या घरातील एकटी मुलगी. आई-वडिल दोघांचा मृत्यू झालाय. मुस्लिम समाजात महिलांना हिजाब आणि बुर्खा घालावा लागतो. हिंदू धर्मात मोकळ्या हवेत श्वास घेता येतो. हिंदू धर्मात महिलांना सन्मान मिळतो असं शिवानी म्हणाली.
आता किती मुस्लिम महिलांची घरवापसी?
शबाना आणि अरविंदच लग्न लावणारे आचार्य पंडित यांचे शंखधार म्हणाले की, गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून शबानाच शुद्धिकरण केलं. त्यानंतर तिने सनातन धर्माचा स्वीकार केला.