भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या पाया महात्मा गांधींनी रचला – डॉ. भागवत कराड

भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या पाया महात्मा गांधींनी रचला – डॉ. भागवत कराड
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर द्वारा प्रोझोन मॉल येथे 02 दिवसीय महात्मा गांधी जीवनप्रवास व स्वच्छता ही सेवा चित्रप्रदर्शनीचे आयोजन.
छत्रपती संभाजीनगर, दिनांक 02.10.2023 – भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर द्वारा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधीजींचा जीवनप्रवास व स्वच्छता ही सेवा विषयावर दोन दिवसीय चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनीचे उदघाटन आज दिनांक 02/10/2023 रोजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री, डॉ. भागवत कराड यांनी रिबीन कट करून व दिपप्रज्वलन करून केले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. विलास सपकाळ, भारतीय योग संस्थांचे प्रांत, डॉ. उत्तम काळवणे, शासकीय कर्करोग हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी, डॉ. अरविंद गायकवाड, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयच्या प्राचार्या डॉ. रोहिणी कुलकर्णी पांढरे, व शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या संगीत विभाग प्रमुख, डॉ. वैशाली देशमुख, महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे उपसचिव, राजाराम सरोदे, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक, संतोष देशमुख, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार आदी उपस्थित होते. यावेळी भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या पाया महात्मा गांधींनी रचला आणि भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात विकसित राष्ट्र घडत आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले व या चित्रप्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन केले. डॉ. विलास सपकाळ यांनी महात्मा गांधींच्या जीवनाचे काही किस्से आपल्या मार्गदर्शनात सांगितले व डॉ. उत्तम काळवणे यांनी योग वर मार्गदर्शन करताना आपल्या शरीराची शुद्धता कशी करायची याची माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख व सूत्रसंचालन, अनुजा पाठक व आभार प्रदर्शन प्रदीप पवार यांनी केले. या चित्रप्रदर्शनीच्या ठिकाणी भारतीय योग संस्थान यांचे योग पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी गांधीजींची प्रिय भजने व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले तसेच केंद्र शासनाचे पंजीकृत आदर्श लोककला सांस्कृतिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी लोककलेच्या माध्यमातून स्वच्छते विषयी जनजागृती केली. ही चित्र प्रदर्शनी दिनांक 02 व 03 ऑक्टोबर, 02 दिवस सर्वांसाठी विनामूल्य खुली असेल व या चित्र प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रदीप पवार, सहकारी प्रिती पवार, शरद सादिगले यांनी विशेष परिश्रम घेतले.
संतोष देशमुख
प्रबंधक
केंद्रीय संचार ब्यूरो
भारत सरकार